
पुसद:- आदिवासी महिला हिने अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नव्हती म्हणून दिनांक 17 /07 /2024 रोजी दंडाधिकारी कार्यालय पुसद या ठिकाणी निवेदन देण्यासाठी विविध सामाजिक व राजकीय नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

आदिवासी महिलेवर अन्याय करणाऱ्या पोलीस जमादार निलेश पेंढारकर यांना जर सात दिवसाच्या आत बंड तर्फ करण्यात आले नाहीत तर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आले आहे. आदिवासी महिलेशी असभ्य वर्तणूक करणाऱ्या पोलीस जमादार व त्यांचे साथीदारांना त्वरित अटक करावी अशी निवेदन द्वारे देण्यात आले आहे. आणि पोलीस पदाचा गैरवापर केल्यामुळे व पोलीस पदाला मलीन करणाऱ्या अशा बेजबाबदार महागाव पोलीस स्टेशन येथील पोलीस जमादारला पदावरून का कमी करू नये असे निवेदनाद्वारे विविध पदाधिकाऱ्याने आणि नेते मंडळींनी सांगितले.
महाराष्ट्र व गोवा कौन्सिलचे सदस्य ऍड.आशिष देशमुख व सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी रंगराव काळे, श्रीराम ग्रामपंचायत चे माजी सरपंच नाना बेले, बिरसा ब्रिग्रेडचे विदर्भ अध्यक्ष, भीम टायगरचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे शहराध्यक्ष, आदिवासी सेवक बिरजा ब्रिग्रेडचे सचिव तथा नगरसेवक उपस्थित होते.