Home » Uncategorized » हेगडी, हूडी, पिपळगाव येथील रस्ते चिखलमय

हेगडी, हूडी, पिपळगाव येथील रस्ते चिखलमय

Share:

या गावाकडे आमदार खासदार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

मुख्य रस्ता

पुसद :-हुडी हे गाव पुसद तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे. हूडी ते हेगडी हा चार किलो मीटर रस्ता कितेक दिवसापासून नादुरुस्त करणे, सोडा परंतु या रस्त्यावरील खड्डे सुद्धा बुजविन्याचे काम झाले नाही.तसेच पुढे चौफुली पासून पिपळगाव व सूतगिरणी मार्गे गुंज रस्ता हा पाच किलोमीटर असताना त्यातील फक्त दोनच किलोमीटर रस्ता हा पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून मागील वर्षी करण्यात आला.

सहा महिन्यातच त्या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर दररोज शाळकरी मुले,शिक्षकर्मचारी,शेतकरी, गावात बेरोजगारी असल्याने रोजगार तरुण रोजगाराच्या शोधात तालुक्यात जाणे येणे करतात.पुसद विधानसभा आमदार इंद्रनिल नाईक तसेच विधानपरिषद आमदार निलय नाईक व विधानपरिषद आमदार मिर्झा साहेब असे तीन आमदार पुसद तालुक्याला लाभले आहे. तरी पण पुसद तालुक्याचा विकास होताना  दिसत नाही . या ठिकाणी फक्त निवडणुकीच्या वेळेवरच या गावात येतात. आणि केवळ निवडणुकीच्या तोंडावर पोकळे आश्वासने देण्यासाठी कार्यकर्ते,पदाधिकारी गावात येतात.निवडणू झाल्यानंतर  कोणीही या गावकऱ्यांचा वाली नसते .

रस्त्यावर खड्डे

शाळकरी मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी पाण्याने भरलेल्या खड्ड्यामुळे कित्येक वेळा शाळेत पोहोचण्यासाठी वेळ होतो. शिवाय रस्त्यावर चिखलामुळे घसरून हात पाय मोडल्याचा घटना सुद्धा घडलेले आहे.  या गावाकडे आमदार खासदार यांनी लक्ष देऊन रस्ते लवकरात लवकर पूर्ण करून द्यावे. ही अपेक्षा गावकऱ्यांची आहे.

Leave a Comment