Home » Uncategorized » पुसद तालुक्यातील आगामी विधानसभेसाठी घेतला स्टॉपोलने अंदाज…..

पुसद तालुक्यातील आगामी विधानसभेसाठी घेतला स्टॉपोलने अंदाज…..

Share:

विधानसभा अंदाज

पुसद:- तालुका हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा तालुका आहे. वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक हे याच तालुक्यातील गवली गावाचे होते.महाराष्ट्राला ह्या नर रत्नाने राष्ट्रीय पातळीवर पोहोचविले हरितक्रांतीसाठी अर्थक परिश्रम वसंतराव नाईक यांनी घेऊन या तालुक्याचे नाव भारतात प्रसिद्ध केले. पुसधरण बांधण्याचे श्रेय वसंतराव नाईक यांनी बांधल्याचे नमूद आहे.सुधाकरराव नाईक यांचेही अप्रतिम कार्य महाराष्ट्रात घडले.बंजारा समाजाचे प्रतिनिधित्व करीत असताना ते साऱ्या महाराष्ट्राचे झाले.

          आता विधानसभेसाठी पुसद तालुका सज्ज झाला आहे. या विधानसभेसाठी तालुक्यातून तीन नावे प्रमुख आघाडीवर आहेत. मा.अनुकूल चव्हाण हे नाव सध्या चर्चेत येताना दिसत आहे. त्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध पुस्तके वह्या वाटप करणे तसेच एम.पी.एस.सी.च्या विद्यार्थ्यांना योग्य ते सहकार्य करणे,अभ्यासिका साठी सहकार्य करणे, वाचनालयाची चळवळ वाढविणे अशा पद्धतीचे कामे करून त्यांनी विद्यार्थी व जन मनात नाव कमविले आहे.सामाजिक कामातून त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे.

         ययाती नाईक हे मा. मनोहर नाईक यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी खासदार संजय देशमुख यांना निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले.खासदार संजय देशमुख यांच्या निवडीने त्यांची विधानसभेवर जाण्याची कामना वाढली.हे स्थानिक आमदार इंद्रनील नाईक चे भाऊ आहेत. ययाती नाईक हे मा. शरद पवार गटाचे उमेदवार असून सध्या ह्या गटाकडे झुकण्याचा लोकांचा कल दिसत आहे.

       स्थानिक आमदार इंद्रनील नाईक यांची पुन्हा विधानसभेसाठी तयारी दिसून येत आहे.जनतेची कामे न झाल्याने जनता त्यांच्यावर नाराज झाली आहे. हे ही मा.मनोराव नाईकाची सुपुत्र आहे. हे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. जनता नवीन उमेदवाराच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे स्थानिक आमदार इंद्रनील नाईकांना यावेळी खूप कष्ट करावे लागतील यात शंका नाही. एकाच घरात दोन भाऊ आमने सामने लढण्याची दाट शक्यता आहे.

       या तीन उमेदवारास चुरस होण्याची दाट शक्यता आहे. यानंतर विधानसभेसाठी मा.अशीष देशमुख महाराष्ट्र गोवा कौन्सिलचे अध्यक्ष आहेत.माजी विधान परिषद आमदार निलय नाईक हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रत्येकाची चढा ओढ लागली आहे. पक्ष कोणाला ठरवतात याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.  

Leave a Comment