Home » व्यवसाय » कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

Share:

कृषी उत्पन्न बाजार समिती पुसद

पुसद:- तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण करत आहेत. तीन महिने पासून कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी यांची वेतन झाले नाही. वेतन वेळेवर होत नाही म्हणून कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण करण्याचे ठरवले आहे.कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न झाल्यामुळे आर्थिक परिस्थितीचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.

         कर्मचाऱ्यांनी आर्थिक परिस्थिती सांगताना असे सांगितले की मुलांचे ट्युशन फी, लाईट बिल, घरामध्ये अन्नधान्य अभाव,आजारपण असे अनेक समस्याला तोंड आम्हाला द्यावा लागत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी 22 जुलै पासून उपोषण करत आहेत. वेतनासाठी कर्मचाऱ्यांना अनेक वेळा उपोषण करावा लागतो.पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीचे स्थिती खूप खालावली आहे.संचालक मंडळ आणि सचिव यांच्यावर कर्मचाऱ्यांनी वेतन वेळेवर करा अशी अनेक वेळा पत्र देऊन सुद्धा कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करतात असे आरोप कर्मचाऱ्यांनी केले आहे .

      कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात स्वच्छतेचा अभाव पिण्यासाठी दूषित पाणी असे अनेक समस्याला कर्मचाऱ्यांना तोंड द्यावा लागतो. संचालक मंडळ यांचे दुर्लक्ष असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना सुद्धा माल विकता वेळेस त्रास सहन करावा लागत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती एक राजकीय अड्डा बनलेला आहे असे चित्र दिसत आहे .

Leave a Comment