घोटाळा प्रकरणातील 80 पानाचे पुरावे देऊन हे कारवाई शून्य

पुसद:- पुरवठा विभागामध्ये जानेवारी 2024 मध्ये झालेल्या एनपीएच धान्य घोटाळ्याचा दावा उपोषणकर्त्यांनी केला आहे. वारंवार तक्रार करून देखील कारवाई न झाल्याने दिनांक 29 जुलै पासून तहसील कार्यालयाच्या बाजूला शब्बीर खान गुन्हे खान यांनी उपोषण सुरू केले आहे.
पुसद तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने तत्कालीन पुरवठा अधिकारी, तत्कालीन सहायक जन माहिती अधिकारी त्यांचा लिपिक धान्य गोडाऊन मॅनेजर यांच्यासह 18 कंट्रोल डीलरची चौकशी करून गुन्हे दाखल करून कंट्रोल डीलरच्या परवाना रद्द करण्यात यावा. यासाठी उपोषण सुरू केला आहे सोबतच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना बडतर्फे करण्याची मागणी देखील उपोषणकर्त्यांनी केली आहे.
चौकशी करण्याबाबत माननीय तहसीलदार साहेब महादेव जोरवर हे चौकशीसाठी टाळाटाळ करत आहे असे या प्रकरणात दिसून आले.