Home » Uncategorized » अनुसयाने घातली यशाला गवसणी

अनुसयाने घातली यशाला गवसणी

Share:

         आठ परीक्षा केल्या एकाच दमात पास

बिरसा अकॅडमीचे सर्व संचालक सत्कार करताना

पार्ङी निंबी:-दिनांक 28 जुलै 2024 ला कुमारी अनुसया तुळशीराम व्यवहारे हिचा सत्कार करण्यासाठी पुसद तालुक्यातील धुंदी (जमिनी) येथे बिरसा अकॅडमी पुसदच्या सर्व संचालक मंडळींनी जाऊन तिचा सत्कार व सन्मान करून अभिनंदन करण्यात आले. काही दिवसाआधी बिरसा अकॅडमी पुसदची विद्यार्थिनी कु. अनुसया तुळशीराम व्यवहारे हीने विविध जिल्ह्यात घेतलेल्या विविध पदासाठी तिची निवड झाली. बीड येथे तलाठी पदी, अकोला येथे पर्यवेक्षक महिला व बालकल्याण,जिल्हा परिषद गडचिरोली येथे कनिष्ठ अनुरेखक, जिल्हा परिषद सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी, छत्रपती संभाजीनगर येथे अनुरेखक पदी, सातारा व कोल्हापूर येथे सहाय्यक आनुरेखक पदी, तसेच एमपीएससी ग्रुप सी साठी पात्र ठरली. एवढ्या परीक्षा तिने दिल्या होत्या, त्या ठिकाणी ती पात्र ठरली. सर्व ठिकाणी तिची निवड झाली यासाठी तिने अथक परिश्रम व मेहनत घेतली. जिद्दीच्या जोरावर तिने हे सर्व यश संपादन केले. तिची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची व गरिबीची असल्याकारणाने ती पुणे औरंगाबाद या ठिकाणी जाऊ शकली नाही. तिची आई व वडील हे दोघेही मजुरी करणारे आहेत. परिस्थितीमुळे तिला पुढील खूप अडचणी येत होत्या, सन 2017- 18 मध्ये ती बिरसा अकॅडमी पुसद या ठिकाणी आली. व तेथील मार्गदर्शकाच्या साह्याने अभ्यास करू लागली. बिरसा अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष राजेश ढगे व संचालक मधुकर मोरझडे यांचे तिला मार्गदर्शन लाभले. तिने आपल्या यशाचे श्रेय बिरसा अकॅडमीचे सर्व संचालक यांना देत आहे. तिचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.
तिने सध्या अकोला जि. प, येथे पर्यवेक्षक महिला व बालकल्याण हे पद स्वीकारले आहे. ती त्या ठिकाणी रुजू झालेली आहे. तिचे अभिनंदन करण्यासाठी बिरसा अकॅडमीचे अध्यक्ष राजेश ढगे सर , मधुकर मोरझडे सर,परमेश्वर मोरे सर,गंगाराम काळे, संजय भिसे सर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित किसन मळघणे, तुकाराम व्यवहारे, तुळशीराम व्यवहारे, राठोड भाऊ, पाईकराव, बोडके,शांतिनाथ व्यवहारे, सोंगे साहेब ,इत्यादी गावकरी मंडळी उपस्थित होते.

अनुसयाचे मनोगत –
बिरसा अकॅडमी मुळे अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली. स्पर्धा परीक्षा विषयी माहिती मिळाली पेपर सोडवून घेतल्याने सराव झाला. अभ्यासातील सातत्य वाढले माझ्या या यशात राजेश ढगे सर व मधुकर मोरझडे सर यांच्यासह परमेश्वर मोरे सर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.या यशात बिरसा अकॅडमीचे मोलाचे योगदान आहे. मी बिरसा अकॅडमीचे ऋण कधीही फेडू शकणार नाही. मी समाजातील कर्मचारी बांधवांना अकॅडमीला मदत करण्याबाबत आव्हान करते मी ही स्वतः आता यापुढे सतत अकॅडमी ला आर्थिक सहकार्य करणार आहे.
– अनुसया व्यवहारे

Leave a Comment