Home » शैक्षणिक » शिक्षण » मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत के.डी.विद्यालयास व्दितीय क्रमांकाचे दोन लाखांचे बक्षीस

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत के.डी.विद्यालयास व्दितीय क्रमांकाचे दोन लाखांचे बक्षीस

Share:

पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बक्षीस वितरण करताना

पुसद :-येथील कोषटवार दौलतखान विद्यालय व गोदाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालयाने पुन्हा एकदा उत्तुंग भरारी मारत
भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” उपक्रमात द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल दोन लाखांचे बक्षीस देऊन दि. ५आगस्ट रोजी बा.ना.अभियांञिकी महाविद्यालय, पुसद येथे पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती पुसद सुशिला आवटे.यांच्या हस्ते, दोन लाख रुपयाचा चेक प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

       फेब्रुवारी_मार्च२०२४ मध्ये तत्कालीन मुख्याध्यापक गजानन वायकुळे यांच्या नेतृत्वाखाली नोडल अधिकारी सौ‌.अर्चना हरीमकर व शिक्षीका मीनाक्षी खंदारे तसेच शाळेतील सर्वच शिक्षकांनी परीश्रम घेतले. शिस्त आणि संस्काराची परंपरा जोपासत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय बाळगणारी पुसदची मातृसंस्था कोषटवार दौलतखान विद्यालय आणि गो. मु. कनिष्ठ महाविद्यालयाचा गौरव सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.
              येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापिका सौ रिता बघेल, मनोज नाईक, अनंत जाधव यांनी पुरस्कार स्वीकारला. संस्थाध्यक्ष राजेश कोटलवार यांनी शिक्षकांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शाळेचे भूषण असलेले विद्यार्थी यांचे मुळे यश मिळाल्याचे सांगितले. तसेच सभापती डॉ. आनंद मुखरे यांनी शाळा प्रशासन, विद्यार्थी, शिक्षकांचे अभिनंदन केले . मुख्याध्यापिका सौ. रिता बघेल यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करतांना संस्थाध्यक्ष , सभापती तथा संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *