Home » विदेश » चोंढी येथे स्वच्छतेचे काम स्वच्छ बचत गटासोबत संवाद

चोंढी येथे स्वच्छतेचे काम स्वच्छ बचत गटासोबत संवाद

Share:

कर्मचारी आणि ग्रामस्थ

पुसद (चोंढी ):-गावाला रोगराईमुक्त करण्यासाठी गावातील महिला बचत गटाच्या महिलांनी आपले घर व आपला परिसर व आपले गाव स्वच्छ ठेवून महिलांनी सांडपाण्याची नियोजन केल्यास रोगराई पासून मुक्त होईल असे आव्हान प्रकाश नाटकर प्रकल्प संचालक जिल्हा परिषद यवतमाळ यांनी केली केले आहे. ते पुसद तालुक्यातील चोंढी येथील बचत गटाच्या महिला सोबत स्वच्छतेचे काम स्वच्छ बचत गटासोबत संवाद सादतांना बोलत होते.

        पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या चोंढी येथे शासननाने नुकतेच घोषित केलेल्या स्वच्छतेचे काम स्वच्छ बचत गटासोबत संवाद मोहीमची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमसाचे उद्घाटक पाणी पु. व स्वच्छता विभाग जि.प.यवतमाळ चे प्रकल्प संचालक प्रकाश नाटकर साहेब,यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मनिषाताई पांडे ह्या होत्या प्रमुख अतिथी सहाय्यक गटविकास अधिकारी संजय राठोड.

      स्वच्छ भारत मिशन विभागाचे जि.समन्व्यक भारत चव्हाण. टी.ङी. चव्हाण विस्तार अधिकारी,

      आकांशित तालुका समन्व्यक पारधी मॅडम, चौधरी मॅडम रामेश्वर जाधव सरपंच, मनीषा पांडे, ग्रामसेवक विजय इसलकर, सदस्य, दिनेश हांडे, पो. पाटील, लक्ष्मण पांडे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, अशा सेविका, बचत गटातील सर्व महिला प्रतिनिधी ग्राम. प.कर्मचारी,ऑपरेटर तसेच मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती.

         सूत्रसंचालन खडसे मॅडम यांनी केले आभार प्रदर्शन ग्रामसेवक विजय इसलकर यांनी मानले. वृक्ष लागवड करून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली…

Leave a Comment