Home » Uncategorized » पुसद तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकामध्ये उभी फुट…..

पुसद तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकामध्ये  उभी फुट…..

Share:

संचालक मंडळ

माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या आदेशाला झुकारून ८ संचालकांनी दिले राजीनामा

पुसद :-कृषी उत्पन्न बाजार समिती ही एक मोठी उत्पन्न देणारी बाजार समिती आहे. काही महिन्यापूर्वी अमोल फुगे यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला होता. माजी मंत्री मनोहरराव नाईक पॅनलचे सर्व संचालक असून सुद्धा त्यामध्ये फूट पडल्याने सर्व जिल्ह्यांमध्ये चर्चाचा विषय बनलेला आहे.

         पुसद तालुक्यातील लोकांमध्ये राजकारणाविषयीची  चीड निर्माण होताना दिसत आहे. २००० साली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री. अवचितराव रामू पवार (राजना) यांनी २०१३पर्यंत सतत १४ वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून कामकाज पाहिले होते. त्यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मोठे बदल दिसून आले होते. पुसद तालुक्यामध्ये त्यांच्या कामाची विशेष चर्चा होत होत्या. सर्व कर्मचाऱ्यांना व शेतकऱ्यांना समान न्याय मिळत असे.

         आज मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळामध्ये निष्क्रिय कारभार पाहायला  मिळत आहे. संचालकामध्ये अस्थिरता असल्यामुळे त्यांच्या कारभारामुळे शेतकरी वर्गांना खूप मोठा नुकसान सोसावा लागत आहे. पुसद तालुक्यातील राजकारणाची चित्र कोणत्या दिशेला जात आहे.याची मात्र पुसद तालुक्यात जोरात चर्चा सुरू आहे.

Leave a Comment