अ.भा. आदिवासी विकास परिषदेचे आयोजन
हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव महिला उपस्थित होते.

पुसद :-शहरामध्ये दरवर्षी आदिवासी समाजाच्या आस्मितेचे जतन करण्यासाठी तसेच आदिवासिंच्या सांस्कृतिक व समाजिक कलगुणांना वाव मिळावा यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट हा जागतीक आदिवासी गौरव दिवस म्हणून घोषीत केला. संपूर्ण जगामध्ये जवळपास 90 देशात आदिवासींचे वास्तव्य आहे . या शुभ दिनाचे औचित्य साधुन जागतिक आदिवासी गौरव दिन संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो. या निमित्ताने आदिवासींचे अधिकार आणि त्यांच्या समस्यावर लक्ष केंद्रित करण्याचा अवसर मिळतो. पुसद तालुक्यामध्ये सुद्धा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद च्या वतीने दरवर्षी प्रमाणे दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये हा दिवस साजरा केला. पुसद शहरामध्ये या दिवसाचे औचित्य साधून भव्य मोटारसायकल रॅली व शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीची सुरुवात वसंत उद्यान, काकडदाती या ठिकाणाहून समारोपीय कार्यक्रम क्रांतीसुर्य बिरसा मुंडा चौकामध्ये झाली
क्रांतीसुर्य बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जय घोषाने पुसद शहर दुमदुमले.
यावेळी अॅड.आशिष देशमुख माधव वैद्य, डॉ.आरती फुपाटे , रंगराव काळे , ऍड सुनील ढाले , सुरेश धनवे , रामदास भङंगे ,राजेश ढगे , गजानन टारफे , लक्ष्मण टारफे , पांडुरंग व्यवहारे ,मारुती भस्मे , नरेंद्र जाधव , गजानन फोपसे नामदेव इंगळे , अशोक तडसे , किसन भुरके , भास्कर मुकाडे , बुद्धरत्न भालेराव, साकिब शहा.विठ्ठल खडसे आशाताई पांडे , विश्वास भवरे , डॉ हरिभाऊ फुपाटे , परशराम डवरे , वर्षा वैद्य , शितल ढगे , सौ. झळके , नंदा उघडे , सीमा भुरके , अरुणा ढोले , नाना बेले नवाज अली , फिरोज खान , संतोष गारुळे , संतोष तडसे,दत्तराव दुम्हारे,नामदेव इंगळे,गजानन उघडे ,बालाजी उघडे , मधुकर मोरझडे , दादाराव चिरंगे , नारायण कऱ्हाळे , विलास पिंपळे , सुरेश बोके , वसंता चिरमाडे , प्रदीप घावस , शामराव व्यवहारे , हरिदास बोके , सूर्यभान बेले , कुणाल बनसोडे , विक्की उबाळे , यांच्यासह हजारोंच्या संख्येने बांधव महिला युवक उपस्थित होते.