Home » सामाजिक » सामाजिक » विश्व आदिवासी दिवस आदिवासी चा सन्मान दिवस

विश्व आदिवासी दिवस आदिवासी चा सन्मान दिवस

Share:

क्रांतिकारी जननायक बिरसा मुंडा



                                                                            प्रत्येक देशात आदिवासी आपली संस्कृती, सभ्यता टिकवून आहेत. निसर्गातील वैभव त्यांनी सांभाळले आहे. आधुनिक युगात बहुतेक समाज मानवता विसरत चालला परंतू आदिवासी लोकांनी नैतिकता जपण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. आजही त्यांनी महिलांना सन्मान देणे, समानता देणे, आदर करणे सोडले नाही. आमच्या घरातील लोक नावाला पुढारली परंतु त्यांची कर्मठ कृती मात्र बदलली नाही. पुरुषसत्ताक संस्कृती ती घरात राबवितात. आदिवासी  कमी शिकलेला स्त्री ला समानता देतो अन आम्ही मात्र तिला बुरसटलेल्या विचारात गुरफटतो. आदिवासी लोक म्हणजे मूळ रहिवाशी होत. भारताचे मुळ लोक. ज्यांनी अदयाप सिंधु संस्कृतीत असलेली सभ्यता टिकवून ठेवली. बऱ्याच आदिवासी लोकात स्त्री ला पती निवडण्याचा अधिकार आहे. आम्ही मात्र मुलीच्या मनाचा विचार करित नाही. आज कुठे थोडा बदल दिसतो आहे. निसर्गातील शुध्द हवेचा श्वास घेत निसर्गातील वनराई सांभाळत हा समाज जगतो आहे. ह्या समाजाच्या सन्मानार्थ सयुक्त राष्ट्र संघाने 1994 ला आदिवासी दिवस 9 ऑगस्ट ला सयुक्त राष्ट्र संघाच्या न्यूयॉर्क येथील कार्यालयात सर्वप्रथम साजरा केला. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. बुत्रोस घाली हे आफ्रिकन होते. ते सामाजिक कार्य करणारे नेते होते. ते 1992 ते 1996 पर्यंत सयुक्त संघाच्या महासचिव पदावर कार्यरत होते. त्यांनी आफ्रिका मध्यपूर्व तसेच जागतिक संकटावर काम केले आहे. ह्या दिवशी आदिवासी जमातींचा सत्कार करण्यात आला. आदिवासी हा घटक निसर्गातील तादात्म्य साधणारा एकमेव घटक आहे. त्याचे हक्क व संरक्षण करणे आमची जबाबदारी आहे. हे सभेत नमुद करण्यात आले. आजही ह्या जमाती सुंदर परंपरा ज्या कर्मठ नाही, वैज्ञानिक आहेत त्या सांभाळून आहे. सर्व नृत्य, गीत, कला एकत्र येऊन करण्याच्या आहेत. सर्वांना सोबत घेऊन चालणारी ही त्यांची संस्कृती आहे. निसर्गातील सकस आहार त्यांनी सोडलेला नाही. रासायनिक फवारे, औषधीमुक्त पिके ते घेतात. आरोग्याला लाभदायक त्यांचा आहार आहे. सांस्कृतिक परंपरा सणादवारे ते टिकवून ठेवत आहे. बिरसा मुंडा हा त्यांचा आदर्श आहे. ते झारखंडचे आदिवासी नेते त्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी इंग्रजांविरुदध लढा दिला. 1899 ते 1900 हया काळात त्यांनी इंग्रजांना झिजवले. मुंडा ही आदिवासी जमात आहे. मुंडा विद्रोह म्हणजे उलगुलान होय. उलगुलान हा त्यांचा युध्दाचा नारा होता. आदिवासी सभ्येतेशिवाय कोणताच देश परिपूर्ण नाही. आम्ही जंगले उडविली मात्र आदिवासी ती जंगले सांभाळीत आहेत. आज सरकार त्यांच्या जमीनीवर विकासाच्या नावावर भांडवलदारांना देत आहे. काश्मीरची जमीन आता भांडवलदार घेत आहे. त्यांना लादलेली बंदी 360 बंद केल्यानी उठली आहे. खाजगीकरण केल्याने निसर्गातील संपत्ती लयास जात आहे. निसर्ग जपण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे. आदिवासींना चांगल्या प्रवाहात आणुन त्यांच्या जमीनी सेंद्रिय पध्दतीने करण्यात आल्या पाहिजे. त्याच्यावरील अत्याचार, लुबाडणूक थांबवली पाहिजे. त्यांचा सन्मान, आदर दिला पाहिजे. स्वाभिमानाने जगणारी जमात भारताचे, विश्वाचे भूषण आहे.
एस.एच. भवरे
पत्रकार, लेखक

Leave a Comment