
पूसद:-तालुक्यातील बेलोरा येथील श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय, बेलोरा येथे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने. दूषित पाण्यामुळे साथरोग तसेच इतरही रोग उद्भवयाची शक्यता नाकरता येत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद यवतमाळ द्वारे स्टॉप डायरिया हे अभियान हाती घेतले आहे. ०४ जुलै पासून या अभियानाचा शुभारंभ केला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद प्रशासनाकडून अनोखे उपक्रम, अभियान राबवले जात आहे. पावसाळ्यात सर्वसामान्यांचे आरोग्य जपण्यासाठी आणि आरोग्याबाबत नागरिकांमध्ये व्यापक व मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. जलजन्य आजार रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यात ‘स्टॉप डायरीया’ हे अभियान राबविण्यात येत असून त्या अनुषंगाने बेलोरा या गावांमध्ये सर्व विद्यार्थी,शिक्षक,पालक, यांनी ‘स्टॉप डायरीया’ बद्दल जनजागृती करून गावातील नागरिकांना शुद्ध पाणी निर्जंतुकीकरण करून पिल्यामुळे आजार होणार नाहीत. याबाबत या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. पाणी हेच जीवन आहे. पण पिण्याचे पाणी हे शुद्ध असले पाहिजेत. हे समजावून सांगण्यात आले तसेच पाणी पीत असताना खाली बसूनच पाणी प्यावे उभ्याने पाणी पिऊ नये.असे देखील सांगण्यात आले.आपण जे पाणी पितो ते साधे पाणी नसून एक प्रकारचे अमृतच आहे. तसेच जे पाणी पिण्याचे आहे ते वाया घालू नये.असेही सांगण्यात आले या कार्यक्रमाला वर्ग ५ ते १२वी चे सर्व विद्यार्थी ,मुख्याध्यापक पंडितराव मस्के प्रा. शालिक वाघमारे प्रा.दत्तरावजी जिवने,नारायण डोरले,कू.शारदा वाढोणकर ,संजय आसोले,विजय वंजारे,भास्कर मुकाडे, रमेश तडसे ,गजानन नरोटे, विठ्ठल ढाले, भिमराव मनवर, दत्तराव काळबांडे, चक्रधर आवळे, शंकरराव आसोले, सखाराम धबाले ,गणेश जाधव, जीवन राठोड ,विष्णू नप्ते,विठ्ठल नप्ते, पांडूरंगराव मारकड,,अमोल मारकड सह सर्व सहकारी बंधू उपस्थित होते .