Home » शिक्षण » बेलोरा ते वाघजाळी रस्त्याची दयनीय अवस्था……

बेलोरा ते वाघजाळी रस्त्याची दयनीय अवस्था……              

Share:

विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून करावा लागतो जीवघेणं प्रवास आमदार आणि लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष!

शेतकरी  पुरातून जाताना
बेलोरा गावातील नाल्याला पूर

पुसद :-तालुक्यातील बेलोरा येथे शिक्षण घेण्यासाठी जवळपास छोट्या छोट्या गावातील विद्यार्थी येत असतात.काही ठिकाणी बस ,खाजगी वाहन,शाळेच्या स्कूल बस ने विध्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात अशातच काही गावांना येण्या जाण्या साठी रस्ता पण नसतो.जे रस्ता असतो तो अतिशय खराब किंवा अवघड असतो. बेलोरा ते वाघजळी साधारण चार किलोमीटर असलेल्या रस्त्याची अशीच दयनीय अवस्था झालेली आहे.या रस्त्याने वाघजाळी गावातील विद्यार्थि, विद्यार्थिनी,नागरिक मोठ्या संख्येने बेलोरा येथे रोज पायी ये जा करत असतात. सध्या पावसाळा सुरू असल्याने या रस्त्याची दुरवस्था अतिशय बिकट झालेली आहे, सध्या पावसाळा सुरू असल्याने सततच्या पावसाने रस्त्यात चिखल झाला असून चिखलातून मार्ग काढत विद्यार्थिनी रोज येजा करत असतात. रस्त्यामध्ये नाला येत असल्याने पावसाळ्यात पुराच्या पाण्यातून विद्यार्थींना जीव मुठीत घेऊन पुराच्या पाण्यातून पायी प्रवास करावा लागतो आहे. स्थानिक शेतकरी शंकर शामराव मारकड यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून काढण्यास मदत केली.अशातच एखादी घटना घडल्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे.या गंभीर समस्यांकडे कुठल्याही लोक प्रतिनिधी, तसेच शासनाचे लक्ष नसून या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. लोक प्रतिनिधी यांनी संबंधित विभागाला सूचना देऊन रस्ता व नाल्यावर पुल करण्याची मागणी बेलोरा व वाघजाळी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.                                                                 
पवन मारकड ,शंकरराव मारकड दिपक करेवार, तानाजी होडगीर,गयाबाई मारकड ,देवराव मारकड शेख शेरूभाऊ,प्रकाश मारकड भाऊराव मारकड ,विष्णू टाक्रस तसेच विद्यार्थ्यांनी ,नागरिकांनी मागणी केली आहे

विद्यार्थी पुरातून  प्रवास करताना

Leave a Comment