Home » शैक्षणिक » शिक्षण » “नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना दिली शपथ”

“नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना दिली शपथ”

Share:

नशा मुक्त भारत शपथ घेताना विद्यार्थी आणि शिक्षक

बेलोरा : पूसद ,तालुक्यातील बेलोरा येथील संस्था स्व. मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, बेलोरा ता.पुसद जि.यवतमाळ या संस्थेने श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बेलोरा या शाळेमधील विद्यार्थ्यांना नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत शपथ देण्यात आली तसेच नशा मुक्त भारत ची जनजागृती केली.
           मादक पदार्थांच्या गैरवापराच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी आणि भारताला अंमली पदार्थ मुक्त बनविण्याच्या दृष्टीकोनातून, नशा मुक्त भारत अभियान (NMBA) 15 ऑगस्ट 2020 रोजी देशात अंमली पदार्थांच्या वापराच्या दृष्टीने सर्वात असुरक्षित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 272 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आले.
            समस्येचा सामना करण्यासाठी प्रतिबंध हे सर्वात प्रभावी धोरण असल्याचे सिद्ध झाले असल्याने मंत्रालयाने औषध मागणी कमी करण्यासाठी राष्ट्रीय कृती योजना तयार केली (NAPDDR). मंत्रालयाने “नशा मुक्त भारत अभियान” भारतातील 272 जिल्ह्यांमध्ये सुरू केले, ज्याचे उद्दिष्ट सूक्ष्म आणि मॅक्रो दोन्ही स्तरांवर असुरक्षित गट आणि सामान्य जनतेला लक्ष्य करून जागरूकता निर्माण, मोठ्या प्रमाणावर एकत्रीकरण आणि सामुदायिक संपर्काद्वारे मादक द्रव्यांच्या गैरवापराच्या वाढत्या धोक्याला सामोरे जाण्यासाठी आहे.
         अंमली पदार्थांचे व्यसन ही केवळ व्यक्तीसाठीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबासाठी आणि मोठ्या प्रमाणावर समाजासाठी धोकादायक परिणामांसह एक गंभीर समस्या बनत आहे. . समस्येचा सामना करण्यासाठी प्रतिबंध हे सर्वात प्रभावी धोरण असल्याचे सिद्ध झाले.
           या उपक्रमामध्ये संस्थेचे उपाध्यक्ष शरद खंदारे, परमेश्वर भगत, अनिल कांबळे, तथा मुख्याध्यापक पंडितराव मस्के, दत्तराव विठ्ठल जिवने, श्री शालिक अमृतराव वाघमारे, श्री भास्कर खुशालराव मुकाडे, श्री विजय प्रल्हाद वंजारे, श्री रमेश नारायण तडसे, श्री गजानन नानाराव नरोटे, श्री दत्तराव पुंडलिक काळबांडे, श्री भीमराव विठ्ठलराव मनवर, श्री नारायण दशरथ डोरले, श्रीमती सारजा वैजनाथ वाढोंकर, श्री संजय भीमराव आसोले, श्री विठ्ठल नामदेव ढाले, श्री शंकर कानोजी आसोले, श्री सखाराम गोविंदा धबाले, श्री गणेश नरसिंग जाधव, सर्व शिक्षकांनी नशा मुक्त भारत अभियान मध्ये सहभागी होऊन शपथ घेतली.

Leave a Comment