Home » शिक्षण » कारागीराने अण्णाभाऊ साठे स्मारकाचे काम केले निशुल्क..

कारागीराने अण्णाभाऊ साठे  स्मारकाचे काम केले निशुल्क..

Share:

देणगीदाराचे सत्कार करताना


पुसद:- तालुक्यातील मांडवा येथे लोकसहभागातून लोकशाहिर, साहित्यसम्राट ,डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारकाचे कार्य युध्द पातळीवर सुरु आहे. यासाठी असंख्य देणगीदात्यांनी श्रम,पैसा,वेळ,वस्तूरुपी आपापल्या परीने सहकार्य केले. या कार्यासाठी स्टाईल फरसी बसविणाऱ्या कारागीराने निशुल्क स्टाईल फरसी बसवून देण्याचा काही महिन्यापूर्वी संकल्प केला होता. आणि केलेला तो संकल्प पूर्णत्वास नेला.

     दिग्रस येथील स्टाईल फरसी बसविण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या नामदेव गरडे या कारागिराने समाजाला आपल्याला काहीतरी देणे लागते. या सामाजिक उदात हेतूने मांडवा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या कामासाठी स्टाईल फरसी बसविण्याच्या कामाची मजुरी २५ हजार रुपये होते. परंतु त्या कामाचा एकही रुपया न घेता काम करून दिले. या कार्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ ,श्रीफळ,शाल देऊन सत्कार करण्यात आला.

     यावेळी नामदेव गरडे, मारोती गजभार,यादव गजभार, शिवाजी आबाळे,साहेबराव सुपले, रमेश राठोड, संतोष आबाळे, संजय लांडगे,सुभाष राठोड,राजु दाढे, देविदास गजभार,दत्ता जोगदंडे,बजरंग राठोड, दिनेश लांडगे, अविनाश जाधव,समाधान लांडगे, शैलेश जाधव,रोहन गजभार,सम्राट गजभार इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment