Home » Uncategorized » बेलोरा येथे निवडणूक साक्षरता मंच स्थापन…

बेलोरा येथे निवडणूक साक्षरता मंच स्थापन…

Share:

शिक्षक आणि विद्यार्थी


बेलोरा : पूसद, तालुक्यातील ,बेलोरा येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय बेलोरा  येथे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमा अंतर्गत लहान मुलाना लोकशाही द्वारे चालणा-या मतदान प्रक्रीयेची माहिती व्हावी,सर्वसामान्य मतदाराला निसंकोच पणे मतादान करता आले पाहिजेत म्हणुन बाल प्रत्यक्ष निवडनुक प्रात्यक्षिक घेण्यात आले.यावेळी मतदान अधिकारी म्हणून युवराज मारकड, मुन्ना शेख, शिवम मारकड, संस्कार मस्के,कार्तिक मारकड इत्यादी मुलांनी आपले निवडनुकीचे काम अतिशय चांगल्याप्रकारे पार पाडले. निवडनुक लढ‌णारे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांनी सुद्धा  अतिशय चांगल्याप्रकारे पूर्ण केले.
         यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.दत्तराव जीवने म्हणाले आजच्या लोकशाही युगात सर्व निवडनुका या अटळ ठरतात.लोकसभेच्या निवडनुका, विधानसभेच्या निवडनु‌का, जिल्हा परीषद निवडनुका, पंचायत समितीच्या निवडणुका, ग्रापंचायत त्याच बरोबर शालेय निवडणुका सुद्धा होतात. ज्या व्यक्तिने आपल्या वयाची अठरा वर्ष पूर्ण केल्यानंतर त्या व्यक्तिला मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. भारतीय संविधानाने प्रत्येकाला निवडणुकांचा हक्क दिलेला आहे तेव्हा सर्व नागरीकाचे कर्तव्य आहे की आपण आपल्या अधिकाराचा वापर योग्य प्रकारे करावा म्हणजे लोकशाही बळकट होईल मतदान करायला जाताना आपण कोणत्याही पक्षाची मदत घेऊ नये,किंवा कोणाची कोणतीही वस्तू घेऊ नये.आपण आपल्या विचाराने मतदान करावे, आपणास योग्य वाटते ते करावे. यावेळी नोडल अधिकारी भास्कर मुकाडे यांनी पहाणि केली.व आवश्यक सुधारणा सांगीतल्या हे काम यशस्वी पूर्ण होण्यासाठी प्रा. शालिक वाघमारे, नारायण डोरले, कु. सारजा वाढोणकर, संजय आसोले, गजानन नरोटे, दत्तराव काळबांडे,,भिमराव मनवर, विजय वंजारे, रमेश तदासे, चक्रधर आवळे, शंकरराव आसोले सखाराम धबाले,गणेश जाधव, जीवन राठोड, विष्णू नप्ते, विठ्ठल पोले, पाडुरंग मारकड, अमोल मारकड,  सह सर्वांनी सहकार्य केले आहे. शेवटी   कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Comment