Home » शैक्षणिक » शिक्षण » परशुराम नाईक बोरगाव येथे सर्व प्रकारच्या नाण्याचे प्रदर्शन संपन्न!!

परशुराम नाईक बोरगाव येथे सर्व प्रकारच्या नाण्याचे प्रदर्शन संपन्न!!

Share:

डॉ. विजय चव्हाण  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना

समास ज्या वेळेला निर्माण झाला त्यावेळी त्याला देवाण-घेवाण करण्यासाठी कोणत्यातरी चलनाची व्यवस्था करणे आवश्यक होते. वस्तूच्या देवाणघेवाण नंतर छोट्या आकारात देण्यासाठी नाण्याचा उगम झाला. विविध देशात ही नाण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यात सोने-चांदी तांबे, पितळ,जस्त,लोखंड याची नाणी तयार झाली. भारतात रिझर्व बँक स्थापना 1935 साली झाल्यानंतर नोटाचा वापर झाला.अशा या नाण्याचा नोटांच्या माहितीचा फायदा विद्यार्थ्यांना झाला पाहिजे. इतिहासाचे साधने म्हणून नाणी याचा अभ्यास केला जातो.

देश विदेश चे चलन

       डॉ. प्रा. विजय चव्हाण यांना नाणे तसेच सर्व प्रकारच्या चलन याबाबत अभ्यास आहे. त्यांनी परशुराम नाईक बोरगाव ह्या शाळेत नाण्यांच्या व विविध चलनाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यात सर्व नाणेबाबत प्रदर्शन ही लावले होते.विद्यार्थ्यांनी नाण्याचा सर्व प्रकार अभ्यासले. डॉ. विजय चव्हाण यांना प्रश्न विचारून अधिक माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.

Leave a Comment