Home » Uncategorized » काळी दौलत येथे दारू अड्डे पोलिसाकडून उदध्वस्त

काळी दौलत येथे दारू अड्डे पोलिसाकडून उदध्वस्त

Share:

अवैध दारू


पुसद :-तालुक्यातील काळी दौलत येथे अवैध गावठी दारू अड्डे पोलिसांनी उदध्वस्त करीत दोघांवार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळी दौलत येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली असून येथे राहणारा राम साहेबराव राठोड व रामभाऊ नागोराव हुलगुडे या दोघांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहे.
             प्राप्त माहितीनुसार, काळी दौलत येथे मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू विकत असल्याची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत साहेब यांना कळाली. त्यानंतर ग्राणीन पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत साहेब, जाधव साहेब, हेड कॉनस्टेबल गावंडे साहेब, पोलीस अंमलदार बाबर साहेब व चालक रबडे यांनी धाड टाकली. धाडीत ८हजार रुपये किंमतीचा ४०किलो सडवा मोहा व ६हजार रुपये किंमतीची ३००लिटर हातभट्टी असा मु्देमाल दोघांकडून जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणात अधिक तपास ग्रामीण पोलीसाकडून केल्या जात आहे.

Leave a Comment