
पुसद:- तालुक्यातील जमुना येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर स्थिती निर्माण झाली असता शेतीचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त पूरग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करिता जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष युवा नेते भावी आमदार येथे ययाती भाऊ नाईक भेट देऊन पाहणी केली.

पूरग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांचे संवाद साधला व त्यांचे मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यादरम्यान समजले की, अजूनही काही भागातील पंचनामे झाले नाही. त्यामुळे राहिलेल्या ठिकाणी लवकरात लवकर पंचनामे करावे अशी प्रशासनला सांगितले आहे.त्यावेळी सोबत ग्रामसेवक तसेच गावातील आजी -माजी सरपंच उपसरपंच,सदस्य तथा शेतकरी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.