Home » शैक्षणिक » सामाजिक » लाखी गावात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक नावाच्या बोर्डाचे तोडफोड…

लाखी गावात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक  नावाच्या बोर्डाचे तोडफोड…

Share:

आरोपी दिलीप ढवळे

पुसद:- तालुक्यातील लाखी गावात हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे केवारी म्हणून ओळख असलेले स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या नावाचे काही दिवसापूर्वी चौकाचे अनावरण करण्यात आले होते. दिनांक ९/९/ २०२४ वार सोमवार रोजी दिलीप ढवळे या व्यक्तीने स्वर्गीय वसंतराव नाईक बोर्डाचे तोडफोड केली.

समस्त गावकरी व तरुण मंडळी

              दिलीप ढवळे या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.  त्यांना विचारण्यात आले तेव्हा त्या व्यक्तीने काही राजकीय लोकांनी बोर्डाचे नुकसान करण्यास सांगितले असे सांगितले. लाखी गावात महानायक स्व.वसंतराव नाईक यांच्या नावाने जातिभेद निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांचा कट असल्याचा लाखी गावातील लोक सांगत आहे. लाखी गावातील लोकांनी एकत्र येऊन एक मताने स्वर्गीय वसंतराव नाईक बोर्डाचे नुकसान करणाऱ्या व जातीभेद निर्माण करणाऱ्या लोका विरुद्ध कठोर कारवाही करण्याची विनंती गावकऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे.

Leave a Comment