Home » जीवनशैली » सामाजिक » पुसद विधानसभेसाठी शरद पवार गटाकडे इच्छुकाची गर्दी….

पुसद विधानसभेसाठी शरद पवार गटाकडे इच्छुकाची गर्दी….

Share:

इच्छुक उमेदवार

पुसद:- विधानसभा निवडणुकीसाठी पुसद मधून राष्ट्रवादी काँग्रेस( एस.पी) पक्षाकडे सात जणांनी उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला पुसद तालुका अनेक वर्षापासून शरद पवार( राष्ट्रवादी काँग्रेस )यांच्या नावाने चालत आलेला आहे.

इच्छुक उमेदवार

         दोन वर्षापासून राजकारणाचे स्वरूप बदलल्यामुळे पुसद तालुक्यामध्ये राजकारणाचे वारे सुद्धा बदलले आहे. लोकप्रिय नेते म्हणून पुसद तालुक्यात माजी मंत्री मनोहरराव नाईक यांची पुसद तालुक्यात ओळख आहे. आता मात्र लोकप्रियता दोन वर्षापासून कमी झाली असे वातावरण दिसत आहे. स्थानिक आमदार इंद्रनील नाईक अजितदादा गटात गेल्यामुळे लोकांनी नाईक घराण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे.येत्या निवडणुकीसाठी नाईक घराण्यापुढे मोठा आव्हान  येणार आहे. माजी मंत्री मनोहर नाईक यांचे मोठे चिरंजीव माजी जिल्हा उपाध्यक्ष ययाती भाऊ यांनी शरद पवार गटाकडे विधानसभेसाठी तिकीट मागितली आहे. नाईक घरामध्ये होणारा संघर्ष बघून आमदारकीसाठी लोकांनी संधी साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

        इच्छुक उमेदवार माजी जिल्हा उपाध्यक्ष ययाती भाऊ, आशिष देशमुख( राष्ट्रवादी शरद पवार लीगल सेल प्रदेशाध्यक्ष), अनुकूल विजयराव चव्हाण (विभागीय अध्यक्ष पुसद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक), प्राध्यापक शिवाजी राठोड( संचालक यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक), शरद मैद (अध्यक्ष पुसद अर्बन बँक), माधवराव वैद्य( माजी उपयुक्त समाज कल्याण) व सो वर्षा माधवराव वैद या दिग्गजांचा समावेश आहे.

Leave a Comment