
गोर बंजारा साहित्य अकादमीला निधी कमी पडू देणार नाही -देवेंद्रजी फडणवीस (उपमुख्यमंत्री)

मुंबई- सागर बंगल्यावर गोर बंजारा समाजातील महाराज लेखक,कवी,साहित्यकार आणि विविध पदाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री कडे विविध मागणी केली आहे.
गोर बंजारा समाजातील विविध मागणी राजपूत भामटा घुसखोरी , गोर बंजारा अकादमी उभारणे, संत सेवालाल महाराज बंजारा/ लभान तांडा समृद्धी योजना, तसेच बंजारा समाजाच्या अनेक समस्या बाबत सागर बंगल्यावर चर्चा करण्यात आली. संत सेवालाल महाराज बंजारा /लभान तांडा समृद्धी योजना सुरू केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करण्यात आले.

तसेच विधानसभेसाठी गोर बंजारा समाजातील नेत्याला स्टार प्रचारक म्हणून नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. भटक्या समाजात इतर जातीचा घुसखोरी होत आहे त्यावर बंधन नावे, जात पडताळणी समितीमध्ये गोर बंजारा समाजाचे दोन सदस्यांची नेमणूक करावी. नॉन क्रिमिलअर अट रद्द करावी. गोर बंजारा साठी वस्तीगृह वाढवण्यात यावी.
गट ग्रामपंचायत मधून तांड्याला वेगळी ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच तांड्याची सध्या स्थिती विशद करून १००० ऐवजी ६०० लोकसंख्या असलेल्या ताट्याला स्वातंत्र्य ग्रामपंचायत स्थापन करावी. अशा विविध मागणी गोर बंजारा च्या वतीने उपमुख्यमंत्री कडे सागर बंगल्या वर जाऊन केली आहे.

त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, माजी आमदार निलेय नाईक, तसेच पोरागडचे संत,महाराज, साहित्यक याडीकार पंजाब चव्हाण, आयोजक मा. रामेश्वर भाऊ नाईक तसेच इतर गोर बंजारा पदाधिकारी उपस्थित होते.