सन 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेतकरी आजही नुकसान भरपाई पासून वंचित

पुसद :-तालुक्यातील सन 2023 या वर्षी झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे खरीप हंगामातील पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शिंदे- फडणवीस सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली होती. जाहीर करण्यात आलेल्या मदतीची आर्थिक रक्कम अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्या मिळाली होती.
श्यामपूर( ब्राह्मणगाव) येथील रहिवाशी रतनसिंग देवसिंग पवार या शेतकऱ्यांचे शेती पारवा( बु ) शेत शिवारात येथे अतिवृष्टी पावसामुळे सन 2023 मध्ये पैसे मिळाले नाही. म्हणून श्यामपूर( ब्राह्मणगाव) या गावातील आर. बी. इंगळे तलाठी ला नेहमी भेट घेऊन नुकसानीचे पैसे अद्यापही मदत मिळत नसल्याचे सतत तलाठ्याला विचारपूस करण्यात येत असे. तलाठी समाधानकारक उत्तर देत नसल्यामुळे रतन सिंग पवार शेतकऱ्यांनी प्रति,मा. उपविभागीय अधिकारी साहेब पुसद, मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ, मा.संजय भाऊ राठोड (पालकमंत्री यवतमाळ ) यांनी पत्राची दखल घेऊन शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई जमा करावी अशी मागणी रतन सिंग देवसिंग पवार या शेतकऱ्याकडून केली जात आहे.
तलाठी आर. बी.इंगळे कामात चुकारपणा करत असल्यामुळे पैसे भेटत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. असे तलाठी गाव पातळीवर असेल तर शेतकऱ्यांना कधीही न्याय मिळवू शकत नाही. पारवा(बु )पांढुर्णा, चिखली गावातील शेतकऱ्यांनी अशा तलाठी वर कठोर कारवाई करण्यात यावी,ही विनंती तहसीलदार साहेबाकडे करण्यात आली आहे.