जनसेवा हीच ईश्वरसेवा – भावी आमदार मा. ययाती भाऊ नाईक

पुसद :-दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी युवा नेते भावी आमदार मा.श्री. ययाती भाऊ मनोहरराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त अग्रवाल मंगल कार्यालय पुसद जि.यवतमाळ येथे ययाची भाऊ नाईक मित्र मंडळ, स्माईल ट्रेन संस्था अमेरिका, श्रीराम हॉस्पिटल अकोला व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी( मेघे )यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य मोफत प्लास्टिक सर्जरी शस्त्रक्रिया शिबिर, सर्व रोग निदान व उपचार शिबिर, महिलांच्या स्तनाचा कर्करोग व गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची पूर्वत तपासणी व योजने अंतर्गत उपचार शिबिर घेण्यात आले.
यामध्ये ३६२ रुग्णांची तपासणी करण्यात आली,यामधून २०रुग्णांना श्रीराम हॉस्पिटल अकोला येथे प्लास्टिक सर्जरी शस्त्रक्रिया करिता अकोला व७० रुग्णांना आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी( मेघे) येथे उपचाराकरिता निवड करण्यात आली.
त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री. वसंतराव पाटील कान्हेकर (काका) उपस्थित होते.कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी भूषण श्री.दीपक भाऊ आसेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थिती डॉ. मोहम्मद नदीम, मा.आशिष देशमुख, श्री. दादासाहेब शेळके, श्री. प्रवीण शिंदे, श्री. गोविंद फुगे, श्री.राधेश्याम जांगिड,श्री. दौलतराव नाईक, श्री.मेरसींग राठोड,श्री. श्याम पाटील, श्री.रंगराव काळे, प्रबोधनकार, पंकज पाल महाराज,श्री रामेश्वर बिच्छेवार,श्री. सुरेश धनवे, श्री. सुधीर देशमुख इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आरोग्य सामाजिक व क्रीडा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणारे डॉक्टर. एम.आर मेगावत, पत्रकार श्री अखिलेश अग्रवाल,श्री देव चौधरी यांना ययाती नाईक जनसेवा पुरस्कार २०२४ ने गौरवण्यात आले.
कार्यक्रमाची प्रास्ताविक श्री सुनील गुट्टेवार, सूत्रसंचालन श्री साहेबराव राठोड व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.प्रशांत पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशवितेसाठी आयोजक ययाती भाऊ नाईक मित्र मंडळाच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी परिश्रम घेतले.