
बेलोरा : पूसद, तालुक्यातील बेलोरा येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येथे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व आपल्या चुका ह्या लक्षात येण्यासाठी आपण कसे वागावे. आपण कोणते काम करावे. हे विद्यार्थ्यांच्या लक्षात यावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष , विद्यालयाचे मुख्याध्यापक पंडितराव मस्के यांनी स्वीकारले. तर मार्गदर्शक म्हणून मा. माधुरी सुरोशे ताई व मा.आनंदी कुऱ्हाडे ताई ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे प्रा.दत्तराव जीवने, प्रा. शालीक वाघमारे, मा.पांडुरंग जामकर सर विचार पिठावर उपस्थित होते. मार्गदर्शक सुरोशे ताई यांनी बोलत असताना सांगितले. की मोबाईलचा वापर हा कमीत कमी करावा आपणास मोबाईल चे व्यसन लागू नये. पत्रलेखन हे खेळापुर्ती शिल्लक राहिले आहे. मोबाईलचा वापर मर्यादित करावा. वेळेचे बंधन पाळावे. विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत. मोबाईल बाळगू नये. मोबाईलचा अतिवापर केला. तर आपण माती होईल. हे सर्वांनी लक्षात ठेवा. असे आवर्जून सांगितले. मा. कुऱ्हाडे ताई यांनी बोलत असताना सांगितले. की तापमान का वाढत आहे. प्रदूषण म्हणजे काय हवेमध्ये कार्बन डाय-ऑक्साइड प्रमाण वाढल्यामुळे जागतिक तापमान वाढ होत आहे. जमीन खूप तापत आहे. वातावरणातील उष्णतेचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हिमालय पर्वताचे बर्फ वितळून पाण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे अनेक शहरे पाण्याखाली येण्याचा धोका वाढला आहे. धोका टाळण्यासाठी आपण प्रदूषण करू नये. झाडे भरपूर लावावीत वाहनाचा वापर कमीत कमी करावा. कचरा व झाडाचे पाने जाळून टाकू नये . आणि सर्व मानव जातीचे होणारे नुकसान टाळावे. हे सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडितराव मस्के म्हणाले. की निसर्ग आपले काम बरोबर करत असतो मानव हा निसर्गाची चक्र बिघडवत आहे. त्यामुळे अनेक समस्या येत आहे. जसे की काही भागात भरपूर पाऊस पडत आहे तर काही भागात अतिशय कमी पाऊस पडत आहे. निसर्ग हा मानवाचा मित्र आहे आणि आपल्या मित्राचे काही नुकसान होऊ नये. याची दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे प्रमुख पाहुणे मा. पांडुरंग जामकर सर आणि प्राध्यापक दत्तराव जीवने यांनीही मार्गदर्शन केल. कार्यक्रमांमध्ये प्रा. भास्कर मुकाडे यांनी सूत्रसंचालन केले. कुमारी आरती मस्के वर्ग 12वा या मुलीने स्वागत गीत म्हटले. सूत्रसंचालन प्रा. दत्तराव काळबांडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन संजय जी आसोले यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी. नारायण डोरले, विजय वंजारे, गजानन नरोटे, भीमराव मनहर,विठ्ठल ढाले, प्रा.योगेश आडे, रमेश तडसे, शंकरराव आसोली, सखारामजी धबाले, गणेश जाधव, विष्णू नप्ते,जीवन राठोड सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच या कार्यक्रमाला भरपूर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. शेवटी सामूहिक पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.