
राष्ट्रीय दिव्यांग संघ व जीवन ज्योती एड्स प्रतिबंधक व प्रबोधन संस्था पुसद श्रीरामपूर यांना वर्षभर पुरेल एवढे धान्य वाटप
पुसद :- 25 सप्टेंबर हा जागतिक फार्मासिस्ट दिवस म्हणून संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो, पुसद येथील व्यापारी भवन येथे औषधी विक्रेता संघ पुसद यांच्यावतीने फार्मासिस्ट डे चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री धनंजय आहाळे, प्रमुख उपस्थिती श्री सुहास चिद्दरवार, जिल्हा संघटन सचिव श्री सुरज डुबेवार, औषधी विक्रेता संघाचे अध्यक्ष श्री रवींद्र पदमवार, सचिव श्री सुशांत महल्ले, कोषाध्यक्ष श्री राहुल डुबेवार, औषधी विक्रेता नागरी सहकारी पतसंस्था यवतमाळ चे डायरेक्टर श्री रणवीर पाटील यांचे उपस्थिती मध्ये संपन्न झाला.
सर्वप्रथम दिव्यांग व अंध बालकांकडून स्वागत गीत गायन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व फार्मासिस्ट बधू भगिनींनी फार्मासिस्ट ओथ घेतली. पुसद संघटनेचे अध्यक्ष श्री रविंद्र पदमवार यांनी आपल्या प्रास्ताविक मध्ये सांगितले की, फार्मासिस्ट डे साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे फार्मासिस्ट चे मूल्य आणि त्याचे समाजातील योगदान ओळखणे हा आहे, फार्मसीस्ट ची भूमिका रुग्णांना अशा प्रकारे सक्षम करणे आहे जेणेकरून ते त्यांचा आत्मविश्वास न गमावता आजाराचा सामना करून शकतील. याप्रसंगी श्री धनंजय आहाळे व श्री सुहास चिद्दरवार यांना श्री सुरज डूबेवार व रवींद्र पदमवार यांच्या हस्ते फार्मासिस्ट जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच दिव्यांग व अंध बालकांना आणि एचआयव्ही ग्रस्त बालकांना एक वर्ष पुरेल एवढे धान्य वाटप करण्यात आले. आदरणीय केमिस्ट श्री समाधान केवटे यांची व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटना पुसदच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा अविरोध निवड झाल्याबद्दल औषधी विक्रेता संघ पुसद च्या पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री सुरज डुबेवार यांनी आपल्या भाषणात फार्मासिस्ट सक्षम कसा बनावा व व्यापारात येणाऱ्या दैनंदिन अडचणी सहज रित्या कशाप्रकारे सोडवता येईल याकरिता मार्गदर्शन केले व अनेक संघटनात्मक बाबी समजावून सांगितल्या.
याप्रसंगी फार्मासिस्ट समाजसेवक श्री प्रशांत गावंडे व श्री रितेश सरगर यांचा विशेष कार्यासाठी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मनिष अनंतवार यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र पदमवार अध्यक्ष औषधी विक्रेता संघ, तसेच आभार प्रदर्शन सचिव श्री. सुशांत महल्ले यांनी केले….