Home » शिक्षण » श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय बेलोरा येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…

श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय बेलोरा येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…

Share:

निरोगी व दणकट शरीरातूनच निरोगी मन वास करते- आशिष जाधव अग्निवीर
विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मुख्याध्यापक व शिक्षक


बेलोरा :-श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय बेलोरा ता. पुसद येथील विद्यार्थ्यांनी विविध खेळात नेत्रदीपक प्राविण्य मिळवले आहे. विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा शैक्षणिक सत्र २०२४-२०२५ मध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावले आहेत.  कु. सानवी संतोष कुऱ्हाडे थालीफेक व गोळाफेक प्रथम क्रमांक वयोगट १७, कु. अमृता दीपक घोलप थाळीफेक प्रथम क्रमांक वयोगट १४, मुनाफ आयुब शेख थाळीफेक प्रथम क्रमांक वयोगट १४, अभिषेक मार्कड जिल्हास्तरावर कुस्तीमध्ये प्रथम विभागीय थरासाठी निवड झाली आहे. वयोगट १९ वजन ७० किलो गट या सर्व खेळाडूंची पुष्पगुच्छ देऊन व छोटी भेट वस्तू देऊन. मुख्याध्यापक श्री पंडितराव मस्के सर यांनी व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. व पुढील कार्यास भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी विद्यालयाच्या माजी विद्यार्थी चि. आशिष दिलीप जाधव राहणार छोटा बेलोरा. यांची अग्नीवीर (सैनिक भरती)मध्ये भरती झाल्याबद्दल सर्व विद्यालयातर्फे यांच्या सत्कार करण्यात आला. तुझ्या हातून देश,सेवा घडो. देशाची प्रगती हो.अशा शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बोलत असताना पंडितराव मस्के मनाली. मानवी जीवनात सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे कोणती असेल. तर ती म्हणजे आरोग्य संपत्ती शरीर कारण जर शरीर निरोगी नसेल.तर दुसरी कोणतीही सुखी माणूस भोगू शकत नाही. निरोगी व दणकट शरीरातूनच निरोगी मन वास करते. आणि शरीर व मन निरोगी राहण्यासाठी. जीवनात खेळांना अनन्यसाधारण स्थान आहे. मोकळ्या हवेत नित्यनेमाने .खेळणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्या कोणत्याही व्यायामाची. वा पथ्यपाळण्याची आवश्यकता भासणार नाही. असा उत्साही माणूस मग आपली. कामे मोठ्या आनंदाने करू शकतो. जपान,चीन या देशातून खेळ व व्यायाम यांना राष्ट्रीय महत्त्व देण्यात आलेले. आहे. तेथे ठराविक वेळेला ‘सायरन’ वाजतो. मग अधिकारी पासून सर्वसामान्य माणसापर्यंत सर्वांना ठराविक व्यायाम करावाच लागतो.                           

विद्यार्थ्यांचा सत्कार करताना शिक्षक

        या कार्यक्रमाची सूत्रसंचालन प्रा.भास्कर मुकाडे व प्रा. दत्तराव काळबांडे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल भास्कर मुकाडे यांच्या सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रा. शालिक वाघमारे, प्रा. दत्तराव जीवने प्रा. योगेश आडे, नारायण डोरले, संजय आसोले, विजय वंजारे, भीमराव मनवर, विठ्ठल ढाले, गजानन नरोटे, कु.सारजा ताई वाढोणकर, रमेश तडसे, संभाजी जाधव, शंकररावजी आसोले, सखाराम धबाले, गणेश जाधव, जीवन राठोड, विष्णू नप्ते, वेदांत मार्कड. अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होती शेवटी सर्वांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Comment