Home » शिक्षण » बेलोरा येथे शालेय विज्ञान व गणित प्रदर्शनी उत्साहात संपन्न

बेलोरा येथे शालेय विज्ञान व गणित प्रदर्शनी उत्साहात संपन्न

Share:

कार्यक्रमाचे उद्घाटन करताना मुख्याध्यापक आणि शिक्षक


पुसद : तालुक्यातील बेलोरा येथील श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अनिरुद्ध पाटील (चोंढीकर) तथा. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव सन्माननीय अश्विनीताई अनिरुद्ध पाटील (चोंढीकर). यांचे प्रेरणेतून. व विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला चालना मिळावी त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा. या उदांत हेतूने. शालेय (आंतरशालेय) विज्ञान व गणित विषयाचे संयुक्त प्रदर्शन भरविण्यात आले. होते. या प्रदर्शनीत अनेक मुलांनी व मुलींनी सहभाग घेऊन आपले. छोटे-छोटे प्रयोग सादर केले. यात वर्ग ७वी व वर्ग ८ वी च्या मुलांनी भरभरून सहभाग घेतला. महेश कांबळे,अभिजीत पाटील, मुनाफ शेख, सोहम पोले, वीर हाके, पार्थ काळबांडे, कृष्णा मस्के, कार्तिक खेडकर, अली पठाण, आयाम शेख, शिवम मार्कड, कार्तिक मारकड, हर्षद धवसे, कु.अमृता घोलप, कु.अंबिका शिंदे, कु. अक्षरा चव्हाण, कु.कोमल चव्हाण, कु. अक्षरा जामकर, इत्यादी. बाल वैज्ञानिकांनी टाकाऊ व हलक्या वस्तू पासून टिकाऊ व उपयुक्त वस्तू बनवून त्या वस्तूचा उपयोग. आपण आपल्या जीवनात कशाप्रकारे करू शकतो. हे प्रत्यक्ष प्रयोग दाखवून समजावून सांगितले. साध्या- साध्या वस्तू एकत्र करून त्यांचा योग्य उपयोग व वापर केला. तर मानवाचे कष्ट व पैसा बचत होईल. हे सुद्धा या मुलांनी आवर्जून समजावून सांगितले.                                          

विद्यार्थी मॉडेल सादर करताना

        या प्रदर्शनीचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक पंडितराव मस्के यांनी फीत कापून केले. व सर्व प्रयोगाचे आपुलकीने पाहणी केली. तसेच प्रयोग सादर करणाऱ्या. विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रश्न व शंका विचारून. विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले. तसेच गणिताचे सूत्र,व्याख्या विचारून पूर्वज्ञान जागृत केले. यावेळी मुख्याध्यापक पंडितराव मस्के यांनी सांगितले की माणसाच्या व्यक्तिगत जीवना प्रमाणेच औद्योगिक क्षेत्रातही विज्ञान ने फार मोठी क्रांति केली आहे. शेतकरी हा फार मोठा वैज्ञानिक आहे. त्या परिस्थितीत चांगली काम कसे करावे. ते शेतकऱ्याकडून शिकण्यासारखे आहे. अनेक असंभाव्य गोष्टी विज्ञानाने माणसाला सहज साध्य करून दिल्या आहेत. विज्ञानानेच माणसाच्या जीवनाला विलक्षण गती दिली. आणि त्याची सर्वांगीण प्रगती घडविली. आज माणूस विविध प्रकारची वाहने वापरतो. विज्ञानाच्या सहाय्याने वैद्यकीय क्षेत्रातील मानवाने फार मोठी झेप घेतली आहे. मानवाने निरोपयोगी झालेले. अवयव बदलून शल्य चिकित्सक त्याला जीवदान देतात .कुरूप व्यक्तीला सुंदर बनवितात. तर अपंगाचे अपंगत्व हे घालून. त्याला जीवनात यशस्वी वाटचाल. करण्याची प्रेरणा देतात. ही सारे विज्ञानाची किमया आहे. यावेळी प्रा.शालिक वाघमारे, प्रा. दत्तराव जीवने, प्रा. योगेश आडे, प्रा.दत्तराव काळबांडे, सखाराम धबाले,नारायण डोरले, गजानन नरोटे, विठ्ठल ढाले,भीमराव मनवर ,संभाजी जाधव, विजय वंजारे, जीवन राठोड, गणेश जाधव शंकरराव आसोले,विष्णू नप्ते,इत्यादी कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय आसोले यांनी केले. शेवटी सर्वांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

मान्यवर पाहणी करताना

Leave a Comment