
चोंढी :-पंचायत समिती पुसद अंतर्गत ग्रामपंचायत चोंढी येथे शासनाच्या निर्दशानुसार तसेच पंचायत समिती पुसदचे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरास यांच्या मार्गदर्शनानुसार सहा. गटविकास अधिकारी, संजय राठोड. स्वच्छ भारत कक्षातील समूह समन्व्यक जाधव साहेब यांच्या मदतीने स्वच्छतेचे विविध कार्यक्रम घेण्यात आले
या स्वच्छतेच्या पंधरवाड्यात सार्वजनिक स्वच्छता करणे, प्लास्टिक मुक्ती धोरण अवलंबणे, कापडी पिशवी वाटप करणे,स्वच्छ अंगण स्पर्धा घेणे, कलापथक राबविणे, स्वच्छता रॅली काढणे, सार्वजनिक स्वचालय स्वच्छता, नवीन सार्व. जि. प. शाळेला शौचालय भूमिपूजन,,घंटागडी स्वच्छता, खाऊ गल्ली ची स्वछता व कचरा कुंडी वाटप आदी उपक्रम राबविण्यात आले व स्वभाव स्वच्छता व संस्कार स्वछता या म्हणीचे महत्व पटवून दिले
या कार्यक्रमला अनिरुद्ध पाटील चोंढीकर, गुलाब नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय व त्याचे चमुचे आणि जि. प. शाळा चोंढी व विधार्थी तसेच शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले.
सदर पंधरवडा यशस्वी करण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक, गावातील सर्व माजी सरपंच, व ग्रामपंचायत चोंढी येथील सरपंच मनीषाताई पांडे, उपसरपंच पृथ्वीराज चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी विजय इसळकर,ग्रामपंचायत सदस्य दिनेश हांडे, ज्ञानेश्वर पांडे, रुखमाबाई दत्तराव गरीबे, कल्याणी अशोक गावंडे, प्रिया पडघणे, अनिताताई पडघणे ग्रामपंचायत कर्मचारी गुरुदेव गोदमले, दिनकर दांडेकर, अभिमन्यू जाधव, व समस्त गावकरी यांनी परिश्रम घेतले