Home » जीवनशैली » सामाजिक » कनेरवाडी गावातील रस्त्याचे अमेय नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन…

कनेरवाडी गावातील रस्त्याचे अमेय नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन…

Share:

माजी जिल्हा परिषद सदस्य अमेय नाईक  रस्त्याची भूमीपूजन करताना

पुसद :-तालुक्यातील माळ पठार  कनेरवाडी येथे अमेय  नाईक यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. जिल्हा परिषद बांधकाम विभाग२ यवतमाळ या योजना अंतर्गत  रस्त्याचे काम कनेरवाडी फाटा ते कनेरवाडी गाव पर्यंत पक्का रस्ता तसेच पुला करिता प्रकल्पातील रक्कम ३५ लक्ष रुपये एवढे मंजूर करण्यात आले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य अमेय नाईक, निळकंठ राव पाटील, विवेक मस्के, धोंडबाराव पोले,देवराव जाधव, बाबुराव मार्कड, आंबा काळे, उपअभियंता सतीश नांदगावकर, बिलवाल साहेब, मोतीराम राठोड, बालाजी बेले, अशोक राठोड,विलास चव्हाण, प्रा.शेषराव राठोड, विजय काळे, नामदेव बेले, सुनील राठोड, भीमराव राठोड,नामदेव नाईक, अनिल राठोड, व्यंकटेश राठोड यांच्या उपस्थित भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. 

     कनेरवाडी चे पत्रकार शेषराव राठोड व बालाजी बेले यांच्या पुढाकाराने खासदार, आमदार यांना वारंवार निवेदन देऊन तसेच विभागीय अधिकाऱ्यांना आणि जि.प बांधकाम विभाग यांना वेळोवेळी निवेदन दिले होते. कनेरवाडी गावाचे रस्तेचे दयनीय अवस्था होती. गावकऱ्यांना ये -जा करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत असे, प्रशासनाकडून  रस्तेला  मंजुरी मिळाल्यामुळे गावकऱ्याकडून समाधान व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment