Home » शैक्षणिक » सामाजिक » निंबी ( कवडीपुर )येथे कौशल्य विकास प्रशिक्षण…

निंबी ( कवडीपुर )येथे कौशल्य विकास प्रशिक्षण…

Share:

अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी

पूसद:- तालुक्यातील ग्रामपंचायत निंबी( कवडीपूर )
येथे 15 व्या वित्त आयोग अंतर्गत 2 दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आला. आयोजक संस्था स्व.मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, बेलोरा ता.पुसद जि.यवतमाळ यांच्या माध्यमातून शेळी पालन, व कूकुट पालन प्रशिक्षण गावातील युवक / युवती तथा गावातील नागरिक यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
             भारतासारख्या मोठी लोकसंख्या असणाऱ्या देशाना भेडसावणाऱ्या प्रश्नापैकी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे रोजगार निर्मिती. रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी देश पातळीवर अनेक प्रयत्न केले जात आहेत.
युवक-युवतींचा प्रशिक्षणाद्वारे कौशल्य विकास करून रोजगार तसेच स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान राबविण्यात येत आहे.
            गरजेनुसार व बदलत्या आधुनिक गरजांनुसार विविध योजना नव्याने आणल्या जातात व त्यांची अंमलबजावणी करण्यात येते. याव्दारे रोजगार निर्मिती अथवा स्वयंरोजगार पुरवून रोजगाराचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणातून रोजगार प्राप्ती हा दृष्टीकोन समोर ठेवण्यात आला आहे. मेक इन इंडिया, स्किल इंडिया या संकल्पनेस अनुसरून कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र हे ध्येय समोर ठेवलेले आहे. राज्यातील युवक-युवतींचा प्रशिक्षणाद्वारे कौशल्य विकास करून रोजगार सन 2025 पर्यंत भारत हा जगातील सर्वात तरूण देशापैकी एक असणार आहे. वाढती बाजारपेठ आणि कुशल मनुष्यबळाचे स्त्रोत असलेल्या भारतात विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासाठी आपल्या देशात कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे कौशल्य विकास या कार्यक्रमास राष्ट्रीय प्राधान्य देण्यात आले आहे.
             या पार्श्वभूमीवर विविध उद्योग व इतर क्षेत्रातील संधीचा फायदा घेण्यासाठी तरूण वयोगटातील उमेदवारांना अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रामध्ये बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानानुसार कौशल्य आधारीत प्रशिक्षण देवून उत्पादनक्षम बनविण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रमाला प्राधान्य देण्यात आले आहे.
         जिल्ह्यातील विविध औद्योगिक समुहांनी या राष्ट्रीय योजनेत सहभाग घेवून आपल्या आवश्यकतेप्रमाणे उमेदवारांचा कौशल्य विकास करून त्यांना रोजगार संधी उपलब्ध करून द्यावी व आपल्याकडील गरज असलेल्या मनुष्यबळाची भूक भागवावी हीच स्व. मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था बेलोरा , या संस्थेची अपेक्षा आहे.
         राज्यामध्ये शेळी-मेंढीपालन व्यवसाय हा प्रमुख ग्रामिण व्यवसाय आहे. शेळया-मेंढयांच्या मांसाचे वाढते भाव, त्यामुळे खात्रीची बाजारपेठ एकापेक्षां अधिक करडे देण्याची क्षमता, इतर रवंथ करण्या-या जनावरांपेक्षा तुलनात्मक दृष्टया लवकर वयांत आणि वजनांस येण्याची क्षमता इ. बाबींमुळे, सुशिक्षीत बेरोजगार युवक, प्रगतशील शेतकरी ह्या व्यवसायाकडे आकर्षित होत आहे. शासन, बँका, विविध समाज विकास महामंडळ, विविध शासकीय विभाग दारिद्रय निर्मुलन, स्वयंरोजगार निर्मिती, पैदास- सुधारणा इ. विविध कार्यक्रमांतर्गत कर्ज आणि अर्थ सहाय्य देत असतात. लाभार्थ्याला व्यवसाय सुरु करतांना शास्त्रीय पायावर उभा रहावा तसेच फायदेशीर व्हावा, ह्या करिता विविध वित्तिय संस्था ह्या व्यवसायला कर्ज देतांना “शेळी-मेंढीपालन प्रशिक्षण” प्रमाणपत्र सादर करण्याची अट घालतात. म्हणून हे प्रशिक्षण देऊन आम्ही लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देत आहोत.
       तसेच उपस्थित स्व. मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष: राजकुमार भगत, सरपंच मा. श्री. मयूर तुकाराम राठोड, श्री. सि.टी. पंडितकर सचिव ग्रामपंचायत निंबी, रुपेश सुरेशदेव जोगदंडे सदस्य ग्रामपंचायत निंबी, सौ. प्रयागबाई वाघु कांबळे, संस्थेच्या मार्गदर्शिका प्रा. डॉ. स्वाती दळवी वाठ मॅडम, संस्थेचे मार्गदर्शक मा.मिलिंद हट्टेकर सर, आश्विन आडे सर, निलेश चव्हाण सर, प्रशिक्षक डॉ. विजय रावते सर, सचिन साहेबराव राठोड, प्रशांत संजय भगत, परमेश्वर सारंगधर भगत, अभिषेक पवार, प्रमोद राठोड, प्रमोद श्रीरामे ,संजय धुळधुळे, निलेश काचगुंडे, आदी. उपस्थित होते.

Leave a Comment