Home » Uncategorized » बेलोरा येथे मतदार जनजागृती रॅली संपन्न

बेलोरा येथे मतदार जनजागृती रॅली संपन्न

Share:

मुख्याध्यापक आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी


पुसद : तालुक्यातील बेलोरा येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बेलोराच्या वतीने सर्व मतदारांना मताची किंमत कळावी या उद्देशाने ही रॅली काढण्यात आली होती. सर्वप्रथम विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक भास्कर मुकाडे यांनी सर्व मुलांना व मुलींना आपली एक मत हे बहुमोल आहे. म्हणून आपली मत निर्णायक ठरू शकते. म्हणून मतदानापासून कोणीही वंचित राहू नये. प्रत्येकाने मतदान करावे मतदान करणे. हे आपले कर्तव्य आहे. आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे. आणि आपण भारतीय लोक हे लोकशाहीची घटक आहोत आपणा सर्वांनाच आपली लोकशाही मजबूत करायची आहे. यासाठी आपण मतदान केलेच पाहिजे. असे सांगितले.        

विद्यार्थी घोषणा देताना

         प्रत्येक मुलांनी आपल्या आई-वडील,काका- काकू. यांना मतदानाचे महत्त्व सांगा. अशी माहिती दिली. तसेच अनेक फलकाच्या माध्यमातून लोकांना संदेश दिला. ताई-बाई,अक्का मतदान करायला चला, मतदार राजा, जागा हो. लोकशाहीचा धागा हो, चला चला मतदान करू,सोडा सर्व काम, चला करू मतदान. संस्कार कांबळे, आली पठाण, अभय कांबळे, सोहम पोले, कृष्णा मस्के, समर्थन नप्ते,कु. ज्ञानेश्वरी जाधव, वैष्णवी भाकरे, कु. मयुरी मुदनर, कु. सृष्टी पोले, कु. मयुरी मार्कड, कु. तनवी मार्कड ,इत्यादी मुलांनी व मुलींनी फलक हाती धरले. व सर्व जनतेला संदेश दिला सर्व. मुलांनी ररांगेत .ढोल पथकाच्या मागे-मागे चालून शिस्तबद्धपणे हा संदेश दिला. ही रॅली यशस्वी पार पाडण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक पंडितराव मस्के प्रा. दत्तराव जीवने,प्रा. शालिक वाघमारे,प्रा. योगेश आडे, प्रा. दत्तराव काळबांडे, संजय आसोले,विजय वंजारे,कु. सारजा वाढोणकर,गजानन नरोटे, संभाजी जाधव, विठ्ठल ढाले,भीमराव मनवर, रमेश तडसे, शंकरराव आसोले, सखाराम धबाले, गणेश जाधव, विष्णू नप्ते, जीवन राठोड, इत्यादी व्यक्तीने परिश्रम घेतले, तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मुलांनी व मुलींनी सहकार्य केले.

Leave a Comment