
पुसद :-विधानसभा महायुतीचे अधिकृत आमदार इंद्रनील नाईक यांचा मांजर जवळा येथे बजरंग बली देवस्थानावर प्रचाराचा नारळ फोडून सुरुवात केली.दर विधानसभेला बजरंग बलीच्या आशिर्वादाने मागिल पंचवार्षिक निवडणूक जिंकून घेतली होती. वडील मनोहरराव नाईक यांनी सुद्धा ग्रामीण प्रचाराची सभा मांजर जवळा येथून केल्यामुळे विजय हा निश्चित मानला जातो मांजर जवळा येथे दर शनिवारी यात्री सारखे गर्दी असते यवतमाळ जिल्ह्यातील अनेक जाती धर्माचे लोक या संस्थानाला येत असतात.
या विराट प्रचार सभेला माजी आमदार निलय नाईक,बि जी राठोड, अनिरुद्ध पाटील चोंढीकर, निळकंठ पाटील, अविनाश देशमुख,अवचितराव पवार,पुंजाराव काईट, अॅ्ड सुनील ढोले, नामदेवराव गडदे, संतोष मुराई ,श्नीकांत चव्हाण, जांबुवंत राठोड ,कैलास जाधव, नामदेवराव मारकड, भाऊराव जाधव, सुभाष राठोड, भीमराव चव्हाण,व या विराट सभेला हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.