Home » जीवनशैली » सामाजिक » बेलोरा येथे पथनाट्य द्वारे मतदार जनजागृती.

बेलोरा येथे पथनाट्य द्वारे मतदार जनजागृती.

Share:

मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी


पुसद : तालुक्यातील बेलोरा येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुलांनी व मुलींनी मानवी साखळी करून व छोटे पथनाट्य करून मतदारांना मतदानाचे महत्त्व समजावून दिले. आपली लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान हे केलेच पाहिजे असे ठामपणे सांगितले. मताधिकार हा फार मोठा अधिकार आहे. आणि हा अधिकार आपण सर्व जनतेने चांगल्या प्रकारे बजावलाच पाहिजे. दुसरे एखादे काम नाही झाली तर हरकत नाही,पण मतदान करण्याचे काम विसरू नका हे सर्व लोकांना माहीत करून देण्यात आले. आपला लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी आपण आपला मतदानाचा हक्क चांगल्या प्रकारे बजावला पाहिजे.सरासरी आपल्या भागात 60 ते 62 टक्के मतदान होते. पण ही टक्केवारी फारच कमी आहे. तेव्हाही टक्केवारी वाढवून व आपल्या अधिकाराची जाणीव ठेवून. आपण देश सेवेचे काम करावे.ते सेवा करणे ही आपले कर्तव्य आहे.आणि हे आपले कर्तव्य आपण चांगल्या प्रकारे पूर्ण करावे,असे विद्यालयाचे मुख्याध्यापक पंडितराव मस्के यांनी गावातील मतदारांना समजावून सांगितले. वर्ग 11 वी व 12 वी मुलींनी छोटे पथनाट्य करून मतदान जनजागृती केली त्यांना सहकार्य करण्यासाठी प्रा. योगेश आडे यांनी पुढाकार घेतला. व या नाट्यद्वारे विनोदातून माता-भगिनी यांना मताचे महत्त्व व मताची किंमत समजावून सांगितले.”मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो! ताई -बाई आक्का, चला मतदानाला चला.” हे सुद्धा आवर्जून समजावून सांगितले. या कार्यक्रमाला गावातील बालाजी सोडगीर ,दादाराव मस्के, दीपक घोलप, मारुती ढाले सह भरपूर गावकरी मंडळी उपस्थित होते. तसेच विद्यालयाचे प्रा.दत्तराव जीवने, प्रा. शालिक वाघमारे, प्रा. दत्तराव काळबांडे,संजय आसोले,विजय वंजारे,संभाजी जाधव, नारायण डोरले, विठ्ठल ढाले, कू.शारदा वाढोणकर ,शंकरराव आसोले, जीवन राठोड, विष्णू नप्ते सह विद्यार्थी सोहम पोले, वीर हाके, आयन शेख, रोहन खेडकर, ऋषिकेश मारकड, हजेब शेख, धीरज राठोड, मुनाफ शेख ,कु.मयुरी मुदनर, कु. तनवी मार्कड कु.सान्वी कुऱ्हाडे, कु.श्रुती पोले, कु. निकिता मारकड, कु. वैष्णवी मार्कड. सर्व विद्यार्थी बंधू-भगिनी उपस्थित होते.

शिक्षक आणि विद्यार्थी

Leave a Comment