
पुसद: तालुक्यातील बेलोरा येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे विद्यालयातील सर्व मुलांकडून आई-वडील यांच्याकडे विनवणी करून मतदानासाठी आग्रह करणारे संकल्प पत्र लिहून त्यांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकांना दिलेला. हा महान अधिकार आहे. तेव्हा आपण सर्व भारतीयांनी आपल्या अधिकाराचा उपयोग केल्याच पाहिजे. लोकशाही म्हणजे जनतेने जनतेसाठी चालवलेले. राज्य. भारतासारख्या विशाल देशात आम्ही लोकशाही राज्यपद्धती राबवतो. याचा आम्हाला मोठा अभिमान वाटतो. मात्र आजही भारतात लोकशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. हेच खरे लोकशाही त राज्यकारभार चालतो. तो लोकांनी निवडून दिलेल्या. प्रतिनिधीच्या मार्फत हे लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी निवडणुक घ्यावी लागते. निवडणूक म्हटली की मताधिकार आला. या मताचे सामर्थ्य केवढे आहे हे प्रत्येक मतदाराला समजले पाहिजेतच. मत विकणे हा जेवढा गंभीर गुन्हा आहे,तेवढाच मतदान न करणे हाही गंभीर गुन्हा आहे. मतदारांनी आपल्या हक्काबद्दल जागरूक असले पाहिजे. कोणत्या व्यक्तीला व पक्षाला निवडावे याचा त्यांनी डोळसपणे विचार केला पाहिजे.लोकशाही राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या हक्काची जाणीव असते. तर ती आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवू शकेल काही लोक नकारात्मक विचाराने म्हणतात की माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे,पण असे नाही,एका मताची किंमत फार मोठी आहे.आपण लक्षात ठेवावे. तसेच आपले मत बाद होणार नाही. याची सुद्धा आपण दक्षता घ्यावी असे. प्रा. दत्तराव जीवने, यांनी सांगितले या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक पंडितराव मस्के, प्रा. शालिक वाघमारे, प्रा. दत्तराव काळबांडे, प्रा. योगेश आडे, नारायण डोरले, संजयराव आसोले, कु.शारदा वाढोनकर विजय वंजारे, रमेश तडसे,गजानन नरोटे, भास्कर मुकाडे, विठ्ठल ढाले, भिमराव मनवर संभाजी जाधव, शंकरराव आसोले, सखाराम धबाले, गणेश जाधव,जीवन राठोड,विष्णू नप्ते, वेदांत मारकड,विठ्ठल पोले, रविकिरण काष्ठे, पांडूरंग मारकड व विद्यार्थी बंधू /भगिनी उपस्थित होते.शेवटी सर्वांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
