
पुसद:तालुक्यातील बेलोरा येथिल श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे बेलोरा येथील शहीद जवान स्व.रामराव साडगीर यांना भावपूर्ण श्रधदांजली अपर्ण करण्यात आली.या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्या- ध्यापक पंडीतराव मस्के हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. दत्तराव जीवने,प्रा.शालिक वाघमारे, विरपत्नी मा.वैशालीताई सोउगीर,मा.केशवराव गडदे, मा. दिलीपराव मारकड हे विचारपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहूने यांनी स्व.रामराव सोडगीर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून तसेच उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी देखिल पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.सैनिकाचे काम हे फार महान काम आहे देशाच्या संरक्षणासाठी सैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या भारत मातेचे संरक्षण करत असतात.आपल्या देशांच्या वीर सैनिकांमुळेच आपण देशात राहणारे सर्व नागरीक हे सुखी आहोत.याची आपण प्रत्येकांनी जाणिव ठेवावी.स्वतःअतिशय त्रास व हालअपेष्ठा सहन करून प्रत्येक सैनिक डोळ्यात तेल घालुन देशाचे रक्षण करत आहेत. काही भागात अतिशय थंडी असते तेथे मानवाला जीवन जगणे अतिशय कठीण आहे, तेथे सुद्धा आपले सैनिक आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत, ही आपणा सर्वांसाठी फार अभिमानाची बाब आहे. स्व. रामराव सोडगीर हे आपल्या विद्यालयाचे माजी विध्यार्थी आहेत याचा आपल्या सर्व कर्मचारी बंधू-भगिणिंना अभिमान आहे,२३ नोव्हेंबर २०१० मध्ये छत्तीसगढ़ (विजापूर) येथे झालेल्या भ्याड हल्यात त्यांना वीरमरण प्राप्त झाले.यावेळी त्यांनी शत्रूसैनिकांना अडविण्याचा अटोकाट प्रयत्न केला,पण ते अयशस्वी झाले,आणि त्यांना आपले प्राण गमवावे लागले. अतिशय चांगल्या स्वभावाचा प्रखर देशभक्त सैनिक आपण गमावला याचे मनोमन दुःख होते, सैनिकांचे जीवनच देशासाठी असते,माझ्या देशातील सर्व जनता सुखी समाधानी असली पहिजे असे प्रत्येक सैनिकाला वाटत असते,असे विद्यालयाचे मुख्याध्यापक पंडितराव मस्के आपल्या अध्यक्षिय भाषणात म्हणाले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भास्कर मुकाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय आसोले यांनी केले. कार्यक्रमाला सर्व कर्मचारी बंधू-भगिणिंसह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.शेवटी सर्वांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
