Home » शैक्षणिक » सामाजिक » शहिद रामराव सोडगीर यांचा 14 वा स्मृतिदिन साजरा

शहिद रामराव सोडगीर यांचा 14 वा स्मृतिदिन साजरा

Share:

गावातील तसेच विविध पदाधिकारी


बेलोरा : पूसद,ता ,माळपठारावरील बेलोरा येथील भूमीपुत्र व केंद्रीय राखीव दलाचे जवान शहीद रामराव नामदेवराव सोडगीर हे छत्तीसगड राज्यातील विजापूर जिल्हात असलेल्या दंतेवाडा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत होते.

           दि. २३/११/२०१० रोजी कर्तव्यावर असताना नक्षलवादयानी घडवून आणलेल्या भुसुरुंग हल्ल्यात त्यांना वीरमरण आले होते. त्यांच्या या अद्वितीय कार्याचा सन्मान म्हणून दरवर्षी बेलोरा या त्यांच्या जन्मगावी त्यांचा १४वा शहिदस्मृतिदिन साजरा करून त्यांना आदरांजली देण्यात येते.
           दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी बेलोरा येथील महादेव मंदिरासमोरून भव्य दिव्य अशी मिरवणूकीला सुरवात करून बस स्टॉप ,गाडगेबाबा चौक,मेन रोड, रामनगर सेवालाल नगर सम्पूर्ण गावभर ही मिरवणूक काढण्यात आली ,यात पुरुष व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नंतर शहीद रामराव सोडगीर यांच्या शहीदस्मारकाच्या नियोजित जागेत ही मिरवणूक आणून तेथे त्यांना आदरांजलीपर कार्यक्रम आयोजित करून आदरांजली अर्पण केली.
          या भव्य कार्यक्रमाचे आयोजन शहीद रामराव सोडगीर कृती समिती, ग्रामपंचायत बेलोरा व गावाकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमच्या अध्यक्ष्यस्थानी माजी सरपंच धोंडबाराव पोले हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देविदास पाटील साहेब ,हे होते. त्याचबरोबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रुप सेंटर नागपुर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे psi इन्स्पेक्टर एच,एल,वांडरे साहेब, asi मोरेश्वर नानाजी कोल्हे साहेब ,हे उपस्थित होते.तसेच वीर पत्नी वैशाली रामराव सोडगीर, अभिषेक रा सोडगीर, विवेक रा सोडगीर वीर आई वच्छलाबाई सोडगीर, ग्रामविकास अधिकारी अश्विन तांबडे, जमादार गजानन चव्हाण, कॉन्स्टेबल दयाल
         या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय प्रकाशराव घुमनर यांनी केले.तर आभारप्रदर्शन शहीद कृती समितीचे अध्यक्ष्य दिलीपराव मरकड यांनी केले.
कार्यक्रमाला खालील मान्यवर उपस्थित होते. पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष,डॉ रामप्रसाद मस्के,
यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment