
पुसद: तालुक्यातील बेलोरा येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे 26 नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक पंडितराव मस्के सर यांनी स्वीकारले तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.दत्तराव जीवने, प्रा.योगेश आडे ,प्रा.शालिक वाघमारे, सखाराम धबाले विचारपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम भारतीय घटनेचे (संविधानाचे)शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्यमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी संविधानाची मूळ प्रत सर्वांना दाखवून मुलांना वाचनासाठी ही मूळप्रत देण्यात आली. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रा. योगेश आडे म्हणाले की भारतीय संविधान हा फार महान ग्रंथ आहे. संविधान सभेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद हे होते. तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्यांनी दिवस-रात्र अभ्यास करून भारतीय संविधान लिहिले आहे. संविधान लिहिण्यासाठी त्यांना २ वर्ष ११ महिने १८ दिवस एवढा कालावधी लागला. संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत. लहान- मोठा,गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न करता .आपण सर्व समान आहोत. ही शिकवण संविधानाची आहे. आम्ही भारताची लोक म्हणजे यात सर्वच लोक आले.कोणताही दोष न ठेवता. असा त्याचा व्यापक अर्थ आहे. येथील निवडणुकीसाठी कोणीही व्यक्ती उभा राहू शकतो. त्याला कोणताही बंधन नाही. फक्त अट एकच आहे,तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा.असे त्यांनी विविध उदाहरणे देऊन भरपूर माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडितराव मस्के म्हणाले आपण सर्वांनी संविधानाच्या नियमानुसार वागावे. म्हणजे कोणावरही अन्याय व अत्याचार होणार नाही. सर्व राज्यकारभार हा सुरळीत चालेल. आपण नेहमी आपल्या देशाचे भले होईल हा हेतू ठेवूनच वागावे. आपल्यामुळे या देशाची थोडी सुद्धा नुकसान होणार नाही असे वागावे म्हणजे निश्चितच या देशाची प्रगती होईल.असे ते म्हणाले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भास्कर मुकाडे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नारायण डोरले, कु.शारदा वाढोनकर,संजय आसोले,विजय वंजारे, प्रा. दत्तराव काळबांडे ,रमेश तडसे, गजानन नरोटे, विठ्ठल ढाले, भीमराव मनवर, संभाजी जाधव, शंकरराव आसोले, जीवन राठोड, विष्णु नप्ते इत्यादींनी सहकार्य केले. या कार्यक्रमात भरपूर मुले -मुली उपस्थित होते. शेवटी सर्वांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.