
पूसद:तालुक्यातील बेलोरा येथिल श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे भारतरत्न, क्रांतीसूर्य डॉ .बाबासाहेब आबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. विजय वंजारे हे होते तर शंकरराव आसोले, सखाराम धबाले,गजानन नरोटे प्रमुख पाहुणे म्हणून विचारपिठावर उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुने व सर्व कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी कु.आरती मस्के या मुलीने स्वागतगीत म्हणून कार्यक्रमाची बहारदार सुरुवात केली.यावेळी कू.निकिता मारकड, कू. सुरेखा कांबळे, कू. प्रेरणा राठोड, कू.अमृता घोलप, कू.अक्षरा चव्हाण, कू.अंबिका शिंदे,कू.संस्कृती मस्के, कू.कोमल चव्हाण, कू.राणी मारकड, कू.राधिका झुंजारे, मुनाफ शेख, संस्कार कांबळे, शिवम मारकड, कू.कोमल चव्हाण,अभिजीत पाटील, राजदीप कांबळे, कू.अनुजा धबाले, कू.तन्वी मारकड, कू.मयुरी मुदनर, कू.आकांक्षा विकास वाढवे.इत्यादी मुलांनी आपले विचार व्यक्त केले, यामधुन बक्षिस देण्यात आले. प्रथम क्रमांक कु.अक्षरा चव्हाण, द्वितीय क्रमांक कु. निकीता मारकड, तृत्तिय क्रमांक संस्कार कांबळे या मुलांना सखाराम धबाले यांच्याकडून पुस्तकरूपी भेट देण्यात आली. व त्यांचे कौतुक केले.यावेळी प्रा. शालीक वाघमारे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगीतले की, बाबासाहेबांना जगातले सर्व लोक मानतात कारण त्यांनी रक्ताचा एकही थेंब न सांडता फार मोठी क्रांती केली.लाखो लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली.गौतम बुद्ध हे क्षत्रिय होते, त्यांना बाबासाहेबांनी गुरु मानले महात्मा ज्योतीराव फुले, संत कबीर साहेब, यांना गुरू मानले. त्यांचे विचार अंगिकारले त्यानुसार बाबासाहेब वागले म्हणूनच ते क्रांती करू शकले. सर्वांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून त्यांनी अनेक वेगवेगळ्या राज्यात धरणे (जलाशय) बांधले. शेतीला पाणी मिळावे हा त्यांचा उद्दात्त हेतू होता.आपणास पुढे जायचे असेल तर भरपूर अभ्यास करावे लागेल असे त्यांनी शेवटी सांगितले.यावेळी शंकरराव आसोले यांनी पोवाडा म्हणून बाबासाहेबांना भावपूर्ण आदरांजली वाहिली व मानवंदना दिली.सखाराम धबाले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की, बाबासाहेबांनी भारत देशाच्या विकासासाठी,भरातदेशाच्या प्रगतीसाठी अहोरात्र प्रयत्न केले, सर्व जनतेला समता, बंधूता या मुल्यांची शिकवण दिली.सर्वांना स्वातंत्र्य दिले. सर्वांना अधिकार दिलेत, सर्वांना समान संधी दिली. मतदानाचा अधिकार दिला आपला प्रतिनिधी निवडण्याचा हक्क दिला.सर्वांच्या भल्यासाठी व कल्याणासाठी त्यांनी काम केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय वंजारे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की शिका! संघटित व्हा!!आणि संघर्ष करा!!!असे बाबासाहेबांनी आम्हाला ठामपणे जाहीर सांगीतले,त्यानुसार आपण वागावे व पुढे जावे.त्यांनी व त्यांच्या कुटुबांनी सर्व सामन्य जनतेसाठी केलेला त्याग व समर्पण याची आठवण ठेवून वागावे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तमन्ना शेख या मुलीने केले तर आभारप्रदर्शन कू.अंजली पेंढारकर या मुलीने केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश तडसे, संजय आसोले, कू.सारजा वाढोणकर,प्रा दत्तराव जीवने, प्रा योगेश आडे, विठ्ठल ढाले,भीमराव मनवर, दत्तराव काळबांडे, संभाजी जाधव,जीवन राठोड, वेदांत मारकड, मुख्याध्यापक पंडितराव मस्के भास्कर मुकाडे, पांडूरंग मारकड गणेश जाधव सह सर्वांनी सहकार्य केले. शेवटी वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.