
पारोळा:- जिल्हास्तरावरून विज्ञान प्रदर्शन घेण्याचे तालुक्यांना सुचित करण्यात आले होते त्याप्रमाणे प्रत्येक तालुक्यात प्रदर्शन घेण्याची चळवळ सुरू झाली. पारोळा तालुक्यातही विज्ञान प्रदर्शन नुकतीच पार पडले. त्यात कोळपिंप्री ह्या उपक्रमशील शाळेचा तिसरा क्रमांक आला.

बी. एस. हायस्कूल ने विज्ञान प्रदर्शनासाठी नैसर्गिक जलशुद्धीकरण ह्या उपकरणाची मांडणी केली होती. ह्या उपकरणाची निवड शाळेच्या कु.गायत्री अनिल पाटील व कु. निकिता गणेश पाटील या विद्यार्थ्यांनी केलेले होती. अत्यंत सुचित मांडणी तसेच उत्कृष्ट सादरीकरण केले होते. सायन्स शिक्षक अनिल चव्हाण सर,दिनेश सोनवणे सर आणि के. आर. नेरकर सर यांनी मार्गदर्शन केले. 9वी ते 12वी या गटात हा प्रयोग सादर केला होता. शाळेचे मुख्याध्यापक आय. व्ही. गव्हाणे सरांनी विद्यार्थ्यांनी व सायन्स शिक्षकांचे अभिनंदन केले. गावातील शाळेचे संचालक मंडळांनी याबाबत खूप कौतुक केले.