
पुसद :-शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग अमरावती द्वारा सलग्नित तसेच युवक मंडळ पुसद द्वारा संचालित वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयाचे विशेष ग्रामीण शिबिराचे आयोजन १७ ङिसेंबर ते २४ ङिसेंबर पर्यंत पुसद तालुक्यातील सेवादास नगर येथे करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मोफत पशु चिकित्सक व जनावराची लसीकरण महिला सुरक्षा जनजागृती सक्षमीकरण आरोग्य तपासणी मोतीबिंदू तपासणी शिबिर व नेत्रदान जनजागृती कृषी विभागाच्या योजना व तंत्रज्ञान आरोग्य विषयक मार्गदर्शन व एड्स रक्त तपासणी शिबिर आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन
या शिबीरामध्ये करण्यात आले आहे
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी ङाँ. आशिष बीजवल, हे होते. शिबिराचे उद्घाटक सरपंच उषाबाई विठ्ठलराव जाधव, यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख अतिथी विजय जाधव, प्रा. डॉ. सय्यद सलमान सय्यद शेरू, समाधान केवटे, करण ढेकळे, प्राचार्य अनिल कुरमे प्रा. नरेश राठोड हे व्यासपीठावर उपस्थित राहतील
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शेषराव राठोड यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रश्मी डेकाटे यांनी केले तर आभार शिवशंकर घरडे यांनी मानले
या कार्यक्रमाच्या यशाकरिता करिता कू मोनिका केवटे कू पायल जाधव कू दुर्गा धुळे कू रोशनी खडसे सुमेध कांबळे सूरज भिसे यांनी अथक परिश्रम घेतले.