
पुसद:-तालुक्यातील बेलोरा येथिल श्री शिवाजी माध्यमिक व उच्च्च माध्यमिक विद्यालयात महान संत वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदयालयाचे मुख्याध्यापक पंडितराव मस्के हे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. दत्तराव जीवने,प्रा.शालिक वाघमारे,संजय आसोले, विठ्ठलराव ढाले विचारपीठावर उपस्थित होते.सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष,प्रमुख पाहुने यांनी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.तसेच इतरही सर्व कर्मचऱ्यांनी गाडगे महाराज याच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.यावेळी दादू राठोड, कार्तिक मारकड, शिवम मारकड, युवराज मारकड, पार्थ काढबांडे, शुभम मस्के, श्रीकांत मारकड, वेदांत आवळे, हर्षद धनसे, कु. राणी मारकड, कु. कोमल चव्हाण, कु. तनवी चव्हाण, कु शारदा पवार कु. अक्षरा चव्हाण, कु. अमृता घोलप, कु.अंबिका शिंदे, कु. ज्ञानेश्वरी जाधव, कु. ऋतुजा राठोड , कु.दिपाली डोरले, कु प्रेरणा राठोड, कु. आरती कांबळे, कु. सुरेखा कांबळे, इत्यादी मुलांनी व मुलींनी आपले विचार व्यक्त केले व गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन केले.प्रमुख पाहुने संजय आसोले यांनी सांगीतले की, गाडगे महाराज हे महान संत होते.”जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले,तोच साधू ओळखावा देव तेथेची जानावा”. गोरगरीबांना जो संत जवळ घेतो त्यांची गरज भागवितो तोच खरा संत आहे,प्रमुख पाहुने विठ्ठल ढाले म्हणाले की,गाडगे महाराज हे कधीच कोण्या जत्रेला गेले नाही कोणत्याही देवाच्या ते पाया पडत नसत,ते स्पष्ट सांगायचे की, देवाला प्रसाद ठेऊ नका, देवाला फळे ठेऊ नका,जो भुकेला आहे त्याला फळे व पेढे द्या म्हणजे त्या माणसाचा आपणास चांगला आशीर्वाद मिळेल.दगडाचा देव आपन ठेवलेला प्रसाद व नारळ खात नाही, तर तेथे कुत्रा,मांजर हे प्राणी येऊन ते प्रसाद खातात व तेथे घान करतात. कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडीतराव मस्के म्हणाले, गाडगे महाराज हे स्वच्छतेचे पुजारी होते,ते कोणत्याही गावाला गेले असता तेथे त्यांचा झाडू चालू लागे.ते सर्व गाव झाडून स्वच्छ व सुंदर करत असत.व नंतर किर्तनाच्या माध्यमातुन लोकांच्या डोक्यातील घाण साफ करत असत.गाडगे महाराज हे कर्ते सुधारक होते.त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात कधीही कोणाला फसवले नाही किंवा कोणाला लुबाडले नाही.या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सारजा वाढोणकर ताई यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा.दत्तराव काळबांडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.योगेश आडे, भीमराव मनवर, रमेश तडसे, नारायण डोरले, गजानन नरोटे,विजय वंजारे,संभाजी जाधव, भास्कर मुकाडे, शंकरराव असोले,गणेश जाधव, सखाराम धबाले,विष्णू नप्ते, जीवन राठोड, रविकिरण काष्ठे,पांडूरंग मारकड, विठ्ठल पोले, वेदांत मारकड इत्यादि कर्मचाऱ्यानी सहकार्य केले व कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केला. तसेच या कार्यक्रमाला भरपूर विद्यार्थी उपस्थित होते.शेवटी सामूहिक पसायदान घेऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.