Home » जीवनशैली » सामाजिक » बेलोरा येथील शाळेत सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी…..

बेलोरा येथील शाळेत सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी…..

Share:

शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर  कर्मचारी आणि सहभागी विद्यार्थी


पुसद:-तालुक्यातील बेलोरा येथिल श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात साली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कु. सिद्धी मारकड या मुलीने अध्यक्षस्थान स्विकारले. तर प्रमुख पाहुने म्हणुन कु.अक्षरा चव्हाण व कु.कोमल चव्हाण या मुली विचारपीठावर विराजमान होत्या.सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच विद्यालयातील सर्व कर्मचारी यांनी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पन करून विनम्र अभिवादन केले. कु.मयुरी मस्के या मुलीने स्वागत गीत म्हणून कार्यक्रमाची बहारदार व चांगली सुरुवात केली. यावेळी कु.आरती डोरले, कु.सोनम पातोडे, कु.अर्पिता वाढवे, कु.पंखुडी मस्के, कु. दिपाली डोरले,कु.खुशी काईट, कु.किर्ती कांबळे,पार्थ काळबांडे, सोहम पोले, आयान शेख, वीर हाके, राजदिप कांबळे,कु.खुशी कांबळे, कू.आरती कांबळे,कू. सानिका मस्के, कु.देवयानी काळबांडे,कु.आरती पोले, कु. रिया पातोडे, कु.वैष्णव चव्हाण,कु. श्रद्धा मारकड, कु. चंचल राठोड, कू.अंबिका पोले, कु. वैष्णवी गडधे ,कु.तन्वी मारकड, कु. मयुरी मुदनर, कु. तमन्ना शेख, कु.संस्कृती बेंगाळ, क.सानिका घुमनर, कु. साक्षी डोरले, कु. दिपाली पोले, कु. अनुजा धवाले, कु. सुचिता वाढवे, कु-राणी मारकड, कु. ऋतुजा चिलगर, कु.निकीता मारकड ,कु.श्रेया मारकड, कु. प्रेरणा राठोड, कु. आरती कांबळे, कू.अंबिका शिंदे , कु.सरोजा मिरटकर, कु. सुरेखा कांबळे,कु.संस्कृती मस्के,कु. अमृता घोलप, कु. राधीका झुंजारे, कार्तिक मारकड, श्रीकांत मारकड ,मुनाफ शेख, शिवम मारकड,शिवम मारकड,आकाश वाढवे, आशिष राठोड इत्यादी मुलांनी व मुलांनी आपल्या भाषनातुन व गीतगायन करून सावित्रीमाई यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी उत्कृष्ठ वेशभुषा करेल त्यांना बक्षीस ठेवण्यात आले होते.ते प्रथम बक्षीस कु. कोमल चव्हाण या मुलीने मिळविले. तर द्वितीय बक्षिस हे कु.अमृता घोलप या मुलीने मिळविले.सदरचे बक्षीस विजय वंजारे व दत्तराव जीवने यांचे कडू‌न देण्यात आले. उत्कृष्ट भाषण करणाऱ्यांना सखाराम धबाले व भीमराव मनवर यांच्याकडून बक्षिस देण्यात आले. हे बक्षीस कु. मयुरी मुदनर व कु.राणी मारकड या मुलींनी मिळविले. या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन कु.सारजा वाढोणकर ताई यांनी केले, तर आभारप्रदर्शन हे कु.अंजली पेंढारकर या मुलीने केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद‌यालयाचे मुख्याध्यापक तसेच सर्व कर्मचारी यांनी अथक परीक्षम घेतले. कार्यक्रमाला भरपूर विदयार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. शेवटी सर्वांना खाऊ वाटप करून पसायदान घेवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करताना शिक्षक

Leave a Comment