
पुसद :-दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ संरक्षण विभागाच्या अंतर्गत तालुका शाखा पुसद संरक्षण विभागाच्या वतीने शेंबाळपिंपरी येथील भदंत चंद्रमणी बुध्दविहारात दोन दिवशीय समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिनांक ११,व १२जानेवारी रोजी करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष भारत कांबळे तर उद्घाटक मोहन भवरे जिल्हाध्यक्ष प्रमुख उपस्थिती म्हणून ज्ञानेश्वर अंभ्यकर जिल्हा उपाध्यक्ष संरक्षण ,ल.पु. काबळे जिल्हा संघटक तर या प्रशिक्षण शिबिराचे मार्गदर्शक म्हणून सैनिक शिक्षक रवींद्र पांचाग अकोला व सचिन वानखडे वणी हे उपस्थित राहणार आहेत.
या दोन दिवशीय प्रशिक्षण शिबिरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची निर्मिती का केली? समता सैनिक दलाची कार्यपद्धती, बौद्धिक व शारीरिक इत्यादी विषयावर मार्गदर्शन होईल.
समता सैनिक दलाच्या प्रशिक्षणास जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे(९७६७१८९२५३), सरचिटणीस विजय बहादूरे (९७६५३०५५२४)तालुका उपाध्यक्ष संरक्षण विभाग विनोद कांबळे (८६०५८१८३५८) यांनी केले आहे.