
दि. 5 (वार्ताहार) पुसद :-मा. उपसंचालक कार्यालय अमरावती विभाग अमरावती व गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये बौद्धिक सत्र या कार्यक्रमांतर्गत प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. शिवराज बोकडे, इतिहास विभाग प्रमुख यशवंत महाविद्यालय नांदेड यांनी ‘‘राष्ट्रीय सेवा योजना व आजचा युवक‘‘ या विषयावर बोलताना वरील उद्गार काढले. राष्ट्रभक्ती व राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी अशा शिबिराची आवश्यकता आहे अशी प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. सुनील काकडे, जिल्हा समन्वयक बुलढाणा हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अविनाश राठोड, जिल्हा समन्वयक, अमरावती प्रा. डाॅ. आर जे डहाके हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मिलिंद कांबळे यांनी केले तर आभार प्रा. नितीन ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व स्वयंसेवक तथा गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयातील सर्व कर्मचारी वृंद यांनी प्रयत्न केले.








