

भारतामध्ये प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल अशी परिस्थिती राहिली नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात लोकांना रोजगार उपलब्ध होत नाही. सर्वच कुटुंब पोटापुरते दररोज मिळवू शकत नाही. दारिद्र्य रेषा पराकोटीला पोहोचली आहे.. अशा परिस्थितीमध्ये पैसे अभावी उपचार घेणे ही जमत नाही. सौ.शुभांगी संदीप अंभोरे या महिलेला सहा महिन्यापासून गर्भाशयाचा आजार असल्याने सतत रक्तस्राव होत असतो. अशा वेळी रवी राठोड यांनी आपल्या मित्राला सांगून मुंबई येथील टाटा हॉस्पिटलमध्ये सदर महिलेला चाळीस ते पन्नास हजार रुपये मदत करण्यास रवि राठोड यांनी सुचविले. त्यावेळी त्यांचा मित्र गजानन शिंदे याने योग्य मदत केली. हा उपचार झाल्यावर देखील काही दिवसांनी पुन्हा जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असल्याने डॉक्टरांनी दोन ते तीन लाख रुपये खर्च येईल असे सांगितले. अशा वेळी सौ शुभांगी अंभोरे यांचा धीर सुटला. त्यावेळी रवि राठोड यांनी डॉक्टरांना सांगून सदर महिलेला आरोग्य योजनेमध्ये नाव दाखल करून लागणारा खर्च वाचविला. माननीय रवी राठोड हे सामाजिक कार्यकर्ते आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक लोकांना मदतीचा हात दिलेली आहे.








