

पुसद:तालुक्यातील बेलोरा येथिल श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ऑलिंपिक वीर खाशाबा जाधव पैलवान यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२३ रोजी झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक पंडीतराव मस्के सर यांनी स्वीकारले तर प्रमुख मार्गदर्शक विद्यालयाचे माजी विदयार्थी शास्त्रज्ञ डॉ.अनिलराव कुऱ्हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुने म्हणुन मा.रमचंद्रजी कुऱ्हे हे विचारपिठावर उपस्थित होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक व प्रमूख पाहुने यांचा विद्यालयाच्या वतीने शाल व पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.प्रमूख मार्गदर्शक डॉ.अनिलराव कुऱ्हे म्हणाले खाशाबा जाधव यांना लहानपनापासूनच कुस्ती या खेळाची आवड होती आणि ती त्यांनी चांगल्याप्रकारे जोपासली, त्यांची घरची परीस्थिती अतिशय गरीबीची होती पण त्यांनी आपली जिद्द सोडली नाही ते लहानपनी जत्रेत न आठवडी बाजारात कुस्ती खेळत असत व तेथे ते विजयी होत असत.काही वेळेस त्यांचा पराभव देखिल झाला पण त्यांनी हार मानली नाही. ते सतत कुस्ती खेळण्याचा सराव करत असत,खूप मेहनत करत असत, म्हणूनच भारताला ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत पहिले पदक मिळवून देण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले. दुसऱ्या देशात कुस्ती खेळण्यासाठी जाण्यास त्यांच्याकडे पैसे नसत तेव्हा त्यांनी आपले राहते घर गहान ठेऊन पैसे मिळविले व तेथे ते कुस्ती खेळण्यासाठी व आपल्या देशाचे नाव रोशन केले.अध्यक्षीय भाषणात पंडीतराव मस्के सर म्हणाले सर्वसामान्य विद्यार्थी देखील खूप मोठा खेळाडु बनू शकतो, येणाऱ्या समस्यांना तोंड देवू शकतो, हे खाशाबा जाधव यांच्या जीवनावरून आपणास समजते.तसेच येणाऱ्या संकटाना आपण घाबरू नये.संकटे येतच असतात त्यांना तोंड देवून जो पुढे जातो तो निश्चितत्य यशस्वी होतो या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन भास्कर मुकाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्तराव काळबांडे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. शालिक वाघमारे, प्रा.योगेशजी आडे, सारजा वाढोणकर, संजय आसोले,राजेश अंबेकर, सरजी विजय वंजारे, गजानन नरोटे, भिमराव मनवर,विठ्ठल ढाले, संभाजी जाधव, रमेश तडसे शंकरराव आसोले,गणेश जाधव, प्रा.दत्तराव जीवने,नारायणराव डोरले,भाऊरावजी माघाडेकाका, सखाराम धबा, जीवन राठोड, विष्णु नप्ते, वेदांत मा,विठ्ठल पोले, पांडूरंग मारकड, रविकिरण काष्टे सह सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते शेवटी सामूहिक पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

