
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो, गुणदर्शनाची संधी मिळते – ग शि डॉ भावना भोसले मॅडम धरणगाव :-
साळवे तालुका धरणगाव येथील इंग्रजी विद्यालय व साने गुरुजी प्राथमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले मॅडम म्हणाल्या की स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सूप्त गुणाना वाव मिळतो, त्याचप्रमाणे त्यांना विविध कला कौशल्य सादर करण्याची संधी मिळते, स्टेज उपलब्ध होते. यातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो व ही मुले पुढील जीवनात नक्कीच यशस्वी होतात. असे सांगितले.


मुख्याध्यापक एस डी मोरे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांमध्ये एकात्मता, समानता व मित्रत्वाचे नाते या कार्यक्रमातून दृढ होत असते. पालकांनी व गुरुजनांनी विद्यार्थ्यांचे कलागुण हेरून त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. असे सांगितले.
यावेळी साळवे केंद्राचे केंद्रप्रमुख दिनेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या गीतांवर सुंदर असे नृत्य सादर केले. छोट्या छोट्या देशभक्तीपर गीत आणि नाट्यछटा सादर करून श्रोत्यांना मंत्रमुक्त केले. अनेक पालक, माजी विद्यार्थी व गावातील मित्रमंडळी कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सराव करून घेतला व पूर्ण तयारी करून उत्कृष्ट असे सादरीकरण करण्यासाठी मदत केली. सांस्कृतिक प्रमुख सौ आर पी नेहेते, प्रतिभा पाटील, पौर्णिमा वारके व व्ही के मोरे यांनी विद्यार्थ्यांकडून नियोजनबद्ध असा कार्यक्रमाची तयारी करून घेतली. उत्कृष्ट कार्यक्रमांना पालकांनी, शिक्षकांनी व प्रमुख पाहुण्यांनी बक्षीसे दिले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व्ही के मोरे यांनी केले. आभार प्रदर्शन बी आर बोरोले यांनी केले. सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.