
पुसद:तालुक्यातील बेलोरा येथिल श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आंतर शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन थाटात संपन्न झाले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. जिवनेसर यांनी स्विकारले तर उद्घाटक म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक पंडीतराव मस्के हे विचार पिठावर उपस्थीत होते.
प्रमुख पाहुने – नारायणराव डोरले, दादाराव मस्के हे उपस्तित होते सर्वप्रथम छत्रपति शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले व कार्यक्रमाचे उद्घाटन पंडितराव मस्के यांनी रिबन कापुन रित्सर कार्यक्रमाचे उद्घाटन झाले असे जाहिर केले सर्व विद्यार्थ्यांनी साधिक वृतीने खेळावे कुणाबद्दलही द्वेष बाळगु नये असे समजावुन सांगीतले. खेळांमध्ये यश अपयश होतच असते,त्याची कोणीही खंत किवा अपमान बाळगू नये. पप्रतिस्पर्धी खेळाडू देखिल आपले बांधवच आहे याचे आपण भान ठेवावे. आपला संघ जसा आपणास प्रिय असतो तसाच दुसरा संघ देखील प्रिय असला पाहिजे हे सर्व त्यांनी समजावून सांगितले प्रत्यक्ष खेळाची सुरुवात करून दिली. यावेळीहे सर्व त्यांनी समजावून सांगितले.यावेळी कबड्डी, धावणे, इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्यात विशेष म्हणजे मुलींनी सुद्धा या सर्व स्पर्धेत मोठ्या प्रमाणात भाग घेतला.आपल्या वर्गाचा विजय व्हावा म्हणून सर्व मुली देहभान व वय विसरुण खेळत होत्या. यावेळी प्रा.दत्तराव काळबांडे प्रा.योगेश आडे,विजय वंजारी,सारजा वाढोणकर, संजय आसोले ,भास्कर मुकाडे , भिमराव मनवर,विठ्ठल पोले, रमेश तडसे, संभाजी जाधव , गजानन नरोटे,सखाराम धबाले,गणेश जाधव ,जीवन राठोड,शंकरराव आसोले,विष्णु नप्ते , वेदांत मारकड सर्व कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.
