
पुसद प्रतिनिधी:-
पुसद तालुक्यातील मांडवा येथील प्रतिष्ठित नागरिक व माजी सरपंच स्व.सुधाकर आडे
यांच्या स्मृतिप्रतीर्थ त्यांचे पुत्र शक्ती व सचिन यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेस ७६ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डायस भेट दिला .
यावेळी तिरंगा ध्वजाचे पूजन सरपंच अल्का ढोले, पोलीस पाटील दत्तराव पुलाते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदिप आबाळे यांच्या हस्ते करण्यात आले व ध्वजारोहण पंडित पुलाते,शक्ती आडे,यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सरपंच अल्का ढोले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदिप आबाळे, उपसरपंच विजय राठोड, पोलीस पाटील दत्तराव पुलाते, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष धम्मदिप ढोले, सोसायटीचे अध्यक्ष वसंता आडे, प्रतिष्ठित ग्रामस्थ, सर्व शिक्षकवृंद, सर्व ग्रा.पं. सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस, आशा सेविका, विद्यार्थी, पालक, तथा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक कैलास भरगाडे यांनी केले तर सूत्रसंचालन शिक्षिका विश्रांती मस्के यांनी केले तर आभार शिक्षक नरेश नालमवार यांनी मानले.